वाचा:
वेंकटेश लक्ष्मण पुरी (वय १०, रा. श्रीकुंज हाऊसिंग सोसायटी, मोरेवस्ती- चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकटेश हा महात्मा फुले इंग्लिश स्कूल आकुर्डी या शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत होता. त्याचे वडील लक्ष्मण पुरी हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत तर आई धुण्या- भांड्याची कामे करते. वेंकटेश याला तीन वर्षांनी लहान बहीण आहे. अमावस्येच्या दिवशी सोमवारी पुरी यांच्या घरी मटणाचे जेवण केले होते. जेवताना वेंकटेश याच्याकडून मटणाचा रस्सा सांडला. त्यामुळे त्याचे वडील त्याच्यावर रागावले. त्याचा राग वेंकटेश याच्या मनात होता.
वाचा:
वेंकटेशने त्या रागातूनच आज सकाळी वडील लक्ष्मण आणि आई आपापल्या कामासाठी निघून गेले असता टोकाचे पाऊल उचलले. आज घरी वेंकटेश आणि त्याची तीन वर्षाची लहान बहीण हे दोघेच होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लक्ष्मण घरी आल्या असता वेंकटेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
वेंकटेशच्या लहान बहिणीकडे चौकशी केली असता तिने सांगितले की, वेंकटेश याने बाथरूमच्या भिंतीवर चढून छताला ओढणीने स्वतःला लटकवून घेतले. याबाबत चिखली पोलीस तपास करीत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times