सोमवारी संध्याकाळी क्लबमधील खोलीत संजीव आणि एका महिलेचा मृतदेह सापडला. ज्या महिलेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चौघे क्लबमध्ये आले होते, तिचाच मृतदेह संजीव यांच्या मृतदेहासोबत सापडला. त्यांच्यासोबत पार्टीसाठी आलेल्या अन्य दोन महिला त्याच खोलीत गंभीर अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्वास कोंडला गेल्यानं दोघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कौशिक यांनी वर्तवला. ज्या खोलीत सगळे पार्टी करत होते, तिथे शेकोटो पेटवण्यात आली होती. रात्री उशिरा सगळे जण पार्टीसाठी आले होते. सोमवारी संध्याकाळी खोलीत दोघांचे मृतदेह सापडले. शेकोटीतून निघालेल्या धुरामुळे त्यांचा श्वास कोंडला गेला असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
दोघांच्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात येईल. त्यातूनच मृत्यूमागचं नेमकं कारण समजू शकेल, असं विकास कौशिक म्हणाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नाईट क्लबमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.