बुरहानपूर: मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यात सध्या एका व्यक्तीची जौरदार चर्चा आहे. या व्यक्तीला चालतं फिरतं घड्याळ म्हटलं जातं. त्याची हीच ओळख आहे. नेपानगरमध्ये वास्तव्यास असलेले सुखलाल मनगटाकडे पाहून वेळ सांगतात. विशेष म्हणजे त्यांच्या हातावर घड्याळ नसतं. मात्र तरीही ते अगदी अचूक वेळ सांगतात.

सुखलाल यांना एका डोळ्यानं दिसत नाही. त्यांच्या कुटुंबात कोणीच नाही. सुखलाल भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करतात. सुखलाल घड्याळ न घालताही अचूक वेळ सांगतात. त्यांचं हे कौशल्य पाहून अनेक जण चकित होतात. सुखलाल बाजाराच्या दिशेनं जात असताना अनेक जण त्यांना मुद्दामहून वेळ विचारतात. सुखलाल मनगटाकडे पाहून वेळ सांगतात. हातात घड्याळ नसतानाही सुखलाल अगदी अचूक वेळ सांगतात.
नाईट क्लबच्या मालकाची ३ मैत्रिणींसोबत पार्टी; रुममध्ये दोघांचा मृत्यू, पोलिसांना वेगळाच संशय
आपल्यावर देवाची कृपा असल्याचं सुखलाल सांगतात. घड्याळ न पाहताच मी वेळ सांगतो. माझ्याकडे निसर्गानं दिलेलं घड्याळ आहे. ते घड्याळ केवळ मलाच दिसतं, बाकी कोणाला दिसत नाही, असं सुखलाल म्हणाले.

सुखलाल अगदी अचूक वेळ सांगतात. मी अनेकदा त्यांना विचारून घड्याळ आणि मोबाईलमधील वेळ सेट करतो. दरवेळी ते अचूक वेळ सांगतात. आम्ही गेल्या २५ वर्षांपासून त्यांना अचूक वेळ सांगताना पाहत आहोत. सुखलाल नेपानगरचं चालतं फिरतं घड्याळ आहेत, असं त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here