कोटा: राजस्थानच्या कोटा शहरात दररोज जनावरं वाहन चालकांवर, प्रवाशांवर, वाटसरुंवर हल्ले करत असल्याच्या घटना घडत आहेत. मात्र तरीही महापालिका प्रशासन कारवाई करत नाही. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे एका वृद्धाला जीव गमवावा लागला आहे. बैलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मृताचे कुटुंबीय महापालिका प्रशासनाविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी याच परिसरात बैलानं एका महिलेवर हल्ला केल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. जुन्या साबरमती वसाहतीत वास्तव्यास असणारे महेश चंद्र थनवार (६२) सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यांनी काठीनं बैलाला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र बैलानं त्यांच्यावर हल्ला केला.
नाईट क्लबच्या मालकाची ३ मैत्रिणींसोबत पार्टी; रुममध्ये दोघांचा मृत्यू, पोलिसांना वेगळाच संशय
बैलानं हल्ला करताच महेश चंद्र खाली पडले. बैल काही वेळ शांत होता. त्यानंतर त्यानं महेश चंद्र यांच्यावर शिंगांनी हल्ला चढवला. यादरम्यान बैलाचं शिंग महेश चंद्र यांच्या चेहऱ्यातून आरपार गेलं. यावेळी एका व्यक्तीनं बैलाच्या दिशेनं दगड भिरकावले. त्यामुळे बैल पळून गेला. काही जणांनी महेश चंद्र यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

महेश चंद्र सरकारी विद्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले. रोज सकाळी ते मंदिरात पूजा करायचे आणि चालायला जायचे. सोमवारीदेखील ते बाहेर पडले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here