cough syrups for kids: १५ डिसेंबरला डॉ. मंगेशकर यांच्या अडीच वर्षांच्या नातवाला खोकल्याचा त्रास झाला. त्याच्या आईनं त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीनं तयार केलेलं कफ सिरप दिलं. सिरप प्यायल्यानंतर २० मिनिटांना तो अचानक कोसळला. त्याचा श्वास थांबला होता. नाडी बंद होती. पुढील २० मिनिटं तो याच स्थितीत होता.

मुलाला डोळे उघडायला, त्याचा रक्तप्रवाह आणि श्वासोच्छवास सुरळीत होण्यास १७ मिनिटं लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. खोकल्याचं औषधामुळे हा प्रकार घडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टर कुटुंबानं याची माहिती घेण्यास सुरुवात केली. मुलाला देण्यात आलेल्या औषधात क्लोरोफेनरामाईन आणि डेक्सट्रोमेथोर्फन यांचं कॉम्बिनेशन असल्याचं त्यांना समजलं. ४ वर्षांखालील मुलांना हे कॉम्बिनेशन देऊ नये असं एफडीएनं सांगितलं आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही माहिती कफ सिरप निर्मिती करणाऱ्या कंपनीनं बाटलीवर छापलेली नव्हती. डॉक्टरदेखील हे औषध प्रिस्क्राईब करतात.
मुलाचं अचानक कोसळण्याचा खोकल्याच्या औषधातील एका घटकाशी संबंध जोडणं सोपं नसल्याचं एका वरिष्ठ बालरोगतज्ज्ञांनी सांगितलं. ‘आपण आतापर्यंत कधीच ४ वर्षांखालील मुलांना कफ सिरपची शिफारस केलेली नाही,’ असं डॉ. विजय येवाले म्हणाले. येवाले यांनी राज्याच्या बाल चिकित्सा कोविड टास्क फोर्सचे सदस्य म्हणून काम केलं आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.