नवी दिल्लीः काही भागांमध्ये आणि स्थानिक पातळीवर करोनाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. आणि सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचं काही राज्यांनी म्हटलंय. पण देशात कुठेही सामूहिक संसर्गाला सुरुवात झालेली नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
मुंबई: करोना संसर्गाच्या काळामध्ये रुग्णांना दिलासा मिळावा, त्यांची लूट होऊ नये यासाठी सरकारने दरनियंत्रण केले. म. फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत गरजू रुग्णांसाठी विनाशुल्क वैद्यकीय उपचारांचाही दिलासा दिला. तरीही मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील काही मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची अक्षरशः लूट सुरू आहे. रुग्णालयांनी लूट केलेल्या अशा रुग्णांच्या नातेवाईकांकडून ‘मटा’ने बिले मिळवली आहेत. यामध्ये जैववैद्यकीय कचरा, उशीचे अभ्रे, वापरलेल्या चादरी, निर्जंतुकीकरण अशा बाबींचाही भार रुग्णांवर टाकण्यात आला आहे.
मुंबई: ‘करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात बेरोजगारांची संख्या वाढली असून अशा कुटुंबांतील लहान मुले भीक मागत असल्याचे दिसत आहे. भीक मागणाऱ्या लहान मुलांची संख्या वाढल्याचे दिसत असूनही राज्य सरकार व पोलिस प्रशासनाकडून कायदेशीर तरतुदींचे पालन करून आवश्यक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे’, असा आरोप करत जनहित याचिकादार ज्ञानेश्वर दारवटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीचा अर्ज केला आहे.
पिंपरी: करोना पॉझिटिव्ह असताना एका महिलेने सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना चुकीची माहिती देऊन सोसायटीमधून थेट
गाठल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई: मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना ड्युटी बजावत असताना करोनोचा संसर्ग भेडसावण्याचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत करोनाने मृत्यू ओढवलेल्या मुंबई पोलिस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. टिळकनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शंकर शिबे यांचा करोनाने मृत्यू ओढवला असून त्यामुळे मुंबईतील करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांची संख्या ५१ इतकी झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times