मुंबई: उच्च परताव्याच्या बाबतीत मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदारांचे नशीब बदलणारे ठरतात. अस्थिर आणि जोखमीचा व्यवसाय मानल्या जाणाऱ्या शेअर बाजारात कधी, कोणती गुंतवणूकही गुंतवणूकदारांना श्रीमंत करू शकते, याबाबत निश्चित सांगता येत नाही. असाच चमत्कार कॅपलिन पॉइंट लॅबच्या शेअर्सने केला आहे… ज्यात केवळ ३५०० रुपये गुंतवलेले गुंतवणूकदार आज करोडपती झाले आहेत. या समभागाने दीर्घ मुदतीत जबरदस्त परतावा दिला आहे.

Stock Market Opening Today: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला तर निफ्टी १८,३५० अंकाच्या खाली
शेअरची किंमत किती वाढली
कॅपलीन पॉईंट लॅबचे शेअर्स २१ फेब्रुवारी २००३ रोजी केवळ २५ पैशाच्या नाममात्र किमतीत उपलब्ध होते, परंतु आता त्याची किंमत ७२६ रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच सुमारे २० वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे २,९०० पट परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत ज्या गुंतवणूकदाराने दोन दशकांपूर्वी या शेअरवर अवलंबून राहून केवळ ३,५०० रुपयांची गुंतवणूक केली असती, आता ती गुंतवणूक १ कोटी रुपयांपर्यंत वाढली असेल.

फार्मा कंपनीच्या शेअरची कामगिरी
कॅपलिन पॉइंट लॅब ही एक पूर्णत: एकात्मिक फार्मा कंपनी आहे, जिचा व्यवसाय आफ्रिकन देशांमध्ये पसरलेला आहे. ही कंपनी मलम, क्रीम बनवते. या फार्मास्युटिकल कंपनीचा व्यवसाय १९९० मध्ये सुरू झाला आणि त्याचे मुख्यालय चेन्नई येथे असून कंपनीची १९९४ मध्ये बाजारात सूचिबद्ध झाली. तर कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला.

एक बातमी आली आणि शेअर्सने रॉकेटसारखी झेप घेतली, ९ दिवसात २४ टक्के परतावा; पाहा असं झालं तरी काय
यावर्षील कामगिरीवर एक नजर
कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर करार ठरले आहेत. वर्ष २०२२ च्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. ६ जानेवारी २०२२ रोजी त्याची किंमत ८८८.४५ रुपये या वर्षीच्या उच्चांकावर पोहोचली होती. पण अलीकडच्या काळात त्याच्या स्टॉकचे मूल्य घसरले आहे. मे २०२२ मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ६०० रुपयांच्या पातळीवर घसरली होती, पण नंतर स्टॉक सावरण्यास सुरुवात झाली आणि आता त्याने पुन्हा ७०० रुपयाची पातळी पार करत ७२६ रुपयांवर आला आहे.

मालामाल! IPO पूर्ण सबस्क्राइब झाला नाही, गुंतवणूक करणारे आज बनले करोडपती; वाचा कोणता आहे हा शेअर
पाच वर्षातील चढ-उतार
गेल्या पाच वर्षातील चढ-उतार पाहिल्यास २२ डिसेंबर २०१७ रोजी कॅपलिन पॉइंट लॅब कंपनीचे शेअर्स ६३८.२५ रुपयांच्या पातळीवर होते. तर २८ डिसेंबर २०१८ रोजी ३८२ रुपयांपर्यंत खाली घसरला. त्यांनतर २० डिसेंबर २०१९ रोजी ३१३.२० रुपयांवर आणि २० मार्च २०२२ रोजी त्याची किंमत फक्त २३८ रुपयांवर घसरले. यानंतर, कंपनीच्या शेअर्सने मोठी उसळी घेण्यास सुरुवात केली आणि ९ सप्टेंबर २०२१ रोजी ९३४ रुपयांपर्यंत पोहोचला. आणि तेव्हापासून त्याने छोट्या-मोठ्या घसरणीसह आपली पातळी कायम ठेवली आहे.

(टीप: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here