gram panchayat election 2022, Gram Panchayat Election : भाजपचा कार्यकर्ता भारी पडला; गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या मुलीच्या पॅनलचा पराभव – gram panchayat election result the defeat of the panel led by bhavini patil daughter of gujarat bjp state president chandrakant patil
जळगाव : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत काही जिल्ह्यांमध्ये बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीतून आपलं नशीब आजमावत होत्या. मात्र भाविनी पाटील यांच्या पॅनलला या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे ज्या पॅनलने पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला त्या पॅनलचं नेतृत्वही भाजपचाच एक कार्यकर्ता करत होता.
खरंतर मागील काळात भाविनी पाटील या मोहाडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. या ५ वर्षात त्यांनी गावात समाधानकारक विकासकामे करून ग्रामस्थांची कौतुकाची थाप मिळवली. मात्र यंदा याठिकाणी सरपंचपद महिला एसटी कॅटेगरीसाठी राखीव होतं. त्यामुळे भाविनी पाटील यांनी सदस्यपदासाठी अर्ज दाखल केला होता. सदस्यपदाच्या निवडणुकीत पाटील यांना विजय मिळवण्यात यश आलं. मात्र त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव झाला आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पक्षाची विजयी पताका कायम ठेवल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यांच्या मुलीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपयश आलं आहे.