मुंबई: एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ मंगळवारी उघडला आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ४७५ कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. कंपनी १७५ कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल, तर ३०० कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे उपलब्ध होतील. या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०२२ असेल.

भारीच! ना अदानी, ना LIC… हे IPO ठरले २०२२ चे स्टार परफॉर्मर, कंपन्यांनी केली बंपर कमाई
प्राईस बँड, लॉट साइज
कंपनीच्या प्रवर्तकांनी एलिन इलेक्ट्रॉनिक्स आयपीओसाठी २३४-२४७ रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. तर ६० शेअर्सची लॉट साइज निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान ६० शेअर्स खरेदी करावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉट खरेदी करू शकतात. विद्यमान प्रवर्तक वसुधा सेठिया, कमल सेठिया, सुमन सेठिया, विजय सिंग सेठिया, कमल सेठिया अँड सन्स आपले शेअर्स विकणार आहेत. कंपनी नवीन शेअर्सच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी, भांडवली खर्चासाठी आणि सध्याच्या प्लांटचे अपग्रेड आणि विस्तार करण्यासाठी करेल.

मालामाल! IPO पूर्ण सबस्क्राइब झाला नाही, गुंतवणूक करणारे आज बनले करोडपती

ग्रे मार्केटमध्ये पदार्पण
या आयपीओपूर्वी एलिन इलेक्ट्रॉनिक्सने अँकर गुंतवणूकदारांमार्फत एकूण १४२.५ कोटी रुपये उभे केले. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना प्रत्येकी २४७ रुपये दराने ५७.६९ लाख इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सनी ग्रे मार्केटमध्ये पदार्पण केले आहे. बाजार निरीक्षकांच्या मते कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ४३ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. आतापर्यंतच्या वेळापत्रकानुसार, कंपनीच्या शेअर्सचे वाटप २७ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण केले जाऊ शकते. कंपनीच्या शेअर्सचे लिस्टींग ३० डिसेंबर २०२२ रोजी होऊ शकते.

गुंतवणूक करावी की नाही
प्रभुदास लिलाधर, रिलायन्स सिक्युरिटीज, हेम सिक्युरिटीज, कॅनरा बँक सिक्युरिटीज, स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट यांसारख्या ब्रोकरेज कंपन्या या इश्यूला ‘सबस्क्राइब’ रेटिंग देतात.

भारतीय कंपनीच्या शेअरची जगभरात चर्चा; ३१५ रुपयाच्या शेअरचा दुपटीहून अधिक परतावा, गुंतवणूकदार मालामाल
कंपनीबद्दल जाणून घ्या
एलिन इलेक्ट्रॉनिक्स भारतातील अनेक आघाडीच्या ब्रँडसाठी दिवे, पंखे आणि इतर लहान स्वयंपाकघरातील उपकरणे तयार करते. हा देशातील सर्वात मोठा अश्वशक्ती मोटर उत्पादकांपैकी एक आहे. ॲक्सिस कॅपिटल आणि जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस, हे आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत तर केफिन टेक्नॉलॉजीजची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here