महिलेची अवस्था पाहून पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. तिला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. रेल्वे रुळांवर सापडलेला मृतदेह आपल्याच पतीचा असल्याची कबुली तिनं दिली. मृत विनोद बलदेवची पत्नी पूनमनं गुन्हा कबूल केल्याची माहिती डीसीपी भगीरथ गढवी यांनी दिली. विनोद आणि पूनम यांच्यात वारंवार वाद व्हायचे. १७ डिसेंबरच्या रात्रीदेखील दोघांमध्ये वाद झाला. विनोदचा मित्र सागर कोळीसोबत पूनमचे अनैतिक संबंध होते. त्यामुळेच विनोद आणि पूनमचा वाद झाला. पूनमनं सागरनं त्याच्या मित्राच्या मदतीनं विनोदची हत्या केली. विनोदच्या गळ्याभोवती फास आवळून त्याला संपवण्यात आलं. यानंतर त्याचा मृतदेह पुलाखाली असलेल्या रेल्वे रुळांवर फेकला.
डिंडोली परिसरात सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उलगडताच अनेकांना धक्का बसला. पत्नी पूनमनं प्रियकर आणि मित्राच्या मदतीनं पतीला संपवलं होतं. तिला मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. पती विनोदचा मृतदेह रेल्वे रुळांवर टाकून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचं भासवण्याचा कट तिनं रचला. रात्री दोनच्या सुमारास रुळांवरून एक ट्रेन गेली. यानंतर विनोदचा मृतदेह रुळांवर टाकण्यात आला. त्यानंतर तिथून जाणाऱ्या रेल्वेचा वेग कमी होता. त्यामुळे मृतदेह पाहताच ट्रेनच्या चालकानं ब्रेक दाबले आणि पोलिसांना माहिती दिली.
पत्नी पूनमचे पतीच्या मित्राशी अनैतिक संबंध होते. घरात झालेल्या दारू पार्टीत पती आणि पत्नीचा प्रियकरदेखील हजर होता. पार्टी सुरू असताना पतीनं पत्नीला शिवीगाळ केली. त्यामुळे प्रियकर संतापला. त्यानं दुपट्ट्याच्या मदतीनं पतीचा गळा आवळला. त्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह रिक्षात ठेऊन रेल्वे रुळांजवळ नेला आणि तिथेच फेकून दिला. रेल्वेखाली आल्यानं विनोदचा मृत्यू झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न तिघांनी केला. मात्र मृतदेह घरातून नेत असताना तिघे सीसीटीव्हीत कैद झाले. त्यातच रेल्वे चालकानं ब्रेक दाबल्यानं तिघांचा कट उधळला गेला.