Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Dec 2022, 1:37 pm
Shirdi News : शिर्डीत आल्यानंतर भक्तांना दर्शनपास काऊंटर, लॉकर, चप्पल स्टॅण्ड, टॉयलेट अशा अनेक गोष्टींची शोधाशोध करावी लागते. आता मात्र, एकाच छताखाली सर्वकाही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

हायलाइट्स:
- तासनतास दर्शनरांगेत उभं राहण्यापासून होणार सुटका
- अत्याधुनिक दर्शनरांग कॉम्प्लेक्स लवकरच सुरू होणार
- साईबाबा संस्थानने तब्बल १०९ कोटी रुपये खर्च करून बांधले
शिर्डीत आल्यानंतर भक्तांना दर्शनपास काऊंटर, लॉकर, चप्पल स्टॅण्ड, टॉयलेट अशा अनेक गोष्टींची शोधाशोध करावी लागते. आता मात्र, एकाच छताखाली सर्वकाही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शन रांगेत ११ हजार भाविक बसू शकतील असा वातानुकूलीत हॉल बनवण्यात आला असून जिथे भक्तांना बसता येईल आणि आल्हाददायक दर्शन कसे दिले जाईल याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
साईबाबा संस्थानचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असून तिरुपती बालाजीच्या देवस्थानच्या धर्तीवर त्यांच्यापेक्षाही सुसज्ज अशी ही दर्शनव्यवस्था सुरू करण्यात आली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन शिर्डीत ही दर्शनव्यवस्था, शैक्षणिक संकुल आणि निळवंडे धरणाचे लोकार्पण करण्याचे त्यांना निमंत्रण दिलं आहे. मार्च महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा सत्कार, भाषणादरम्यान शिंदे भावूक
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.