मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने ट्रॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर पृथ्वी शॉच्या रुपाने मुंबईला पहिला धक्का बसला, तो फक्त १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर आणि यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार यादवने फक्त ८० चेंडूत १ षटकार आणि १५ चौकारांसह ९० धावा केल्या. त्याचे शतक फक्त १० धावांनी हुकले. दुसऱ्या बाजूला यशस्वीने शतक पूर्ण केले. त्याने १ षटकार आणि २७ चौकारांसह १९५ चेंडूत १६२ धावा केल्या.
वाचा-
…
सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर यशस्वीने कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी २०६ धावांची द्विशतकी भागिदारी केली. कर्णधार अजिंक्यने देखील शतक पूर्ण केले. प्रथम श्रेणीतील हे त्याचे ३८वे शतक ठरले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य १०८ धावांवर नाबाद खेळत होता. त्याने १९० चेंडूत १३९ धावा केल्या, यात २ षटकार आणि १८ चौकारांचा समावेश आहे. तर सरफराज खान ४० धावांवर खेळत आहे.
वाचा-
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने ९० षटकात ३ बाद ४५७ धावा केल्या आहेत.