दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील एक भाजी विक्रेता थेट सरपंच पदावर बसला आहे. डोंगर कपारीत असणाऱ्या वरेवाडीतील आनंदा रामचंद्र भोसले यांनी जनसुराज्य पक्षाच्या विश्वास बाबू भोसले यांचा पराभव केलेला आहे. या दोन्ही निकालांची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.

आनंदा भोसले
आनंदा भोसले हा पहिल्यापासूनच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून आनंद भोसले यांची पंचक्रोशीत ओळख आहे. बांबवडे परिसरात भोसले यांचे भाजी विक्रीचे दुकान असून यापूर्वीही ते डेप्युटी सरपंच म्हणून निवडून आले होते. आनंद भोसले यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारिता विभागातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र पत्रकारितेशी जुळवून न घेता त्यांनी थेट भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच त्यांनी संपर्क तयार करून आपल्या गावाच्या सरपंच पदावर विराजमान झाले आहेत.
आनंदा भोसले हे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सरपंच पदाच्या निवडणूक रिंगणात होते. त्यांना 391 मते मिळाली असून त्यांच्या विरोधात जनसुराज्येचे विश्वास भोसले यांना 330 मते मिळाली आहेत. आनंद भोसले यांचा 60 मतांनी विजय झाला.
हेही वाचा : अजित दादा ज्यांच्यासाठी मैदानात उतरले, त्या पवार समर्थकाचं भर प्रचारातून अपहरण झालं होतं
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील कासुर्डी गावातील राष्ट्रवादीचे सरपंचपदाचे उमेदवार अजय मालुसरे यांनीही केवळ एका मताने विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादीच्या अजय मालुसरे यांना 373 मते तर काँग्रेसच्या परशुराम मालुसरे यांना 372 मते मिळालीत. केवळ एका मताने सत्तापरिवर्तन पाहायला मिळाले आहे. परशुराम मालुसरे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आहे. या निकालाच सर्व तालुक्यामध्ये चर्चा असलेली पाहायला मिळत आहे.
निकाल समोर आल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने होते. आधी बाचाबाची झाली त्यानंतर गटातील समर्थक एकमेकांना भिडले. पोलीस स्टेशमनमध्ये तक्रारी करण्यात आल्या असून गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी संघर्ष वाढू नये म्हणून कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा : थोरातांना मूळ गावातच मोठा धक्का, विखे पाटलांच्या गटातील महिला सरपंचपदी विराजमान