दरम्यान, राज्यातील एकूण ७ हजार ६८२ ग्रामपंचायतीत ६५ हजार ९१६ सदस्य तसेच थेट सरपंचपदासाठी निवडणूक झाली. त्यापैकी १४ हजार २८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत आणि ६९९ सरपंच बिनविरोध निवडून आले. ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते.
Home Maharashtra gram panchayat election news, ग्रामपंचायतीत कोणाला किती जागा? शिंदे-फडणवीसांचा दावा खोडत अजित...
gram panchayat election news, ग्रामपंचायतीत कोणाला किती जागा? शिंदे-फडणवीसांचा दावा खोडत अजित पवारांनी आकेडवारीच मांडली – ncp leader ajit pawar reaction on gram panchayat election result and shinde fadanvis statement
नागपूर : राज्यभरातील ७ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या मतदानानंतर काल या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ही निवडणूक पक्षीय चिन्हांवर लढवली जात नसल्याने नेमकं कोणाचं पारडं जड ठरलं, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विविध पक्षांकडून वेगवेगळे दावा केले जात असून आज विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच नंबर वन ठरल्याचं म्हटलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजप-शिंदे गटाला मिळाल्याचा दावा खोटा असून महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने कौल दिल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केला.