ब्युनस आयर्स: यंदाच्या फिफा विश्वचषकावर अर्जेंटिना संघाने आपले नाव कोरले आहे. फ्रान्सच्या संघाला मेस्सीच्या नेतृत्त्वाखालील अर्जेंटिनाने पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-२ ने हरवत मेस्सीचे स्वप्न पूर्ण केले. या विजयानंतर अर्जेंटिना एकच जल्लोषात वेडा झाला आहे. अर्जेंटिनामधील या विजयाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ, फोटो एकच अंगावर शहारे आणणारे आहेत.

वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर महान कर्णधार लिओनेल मेस्सीचा संघ मायदेशी पोहोचला, तेव्हा ५० लाख लोकांचा जनसागर त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरला होता. संघाला खुल्या बसमध्ये परेड करायची होती. सुमारे ११ किमीपर्यंत खचाखच भरलेल्या गर्दीत प्रवेश करताच चाहत्यांनी टीम बसमध्ये उड्या मारायला सुरुवात केली. काही जण बसबाहेरही पडले. प्रकरण गंभीर होत असल्याचे पाहून हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले आणि टीमला एअरलिफ्ट केले.

वाचा: अजिंक्य रहाणेचे झंझावाती द्विशतक! टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमनाचा डंका

अर्जेंटिनामध्ये उसळला निळा जनसागर .

हेही वाचा: भारतासाठी फ्रीमध्ये पिच तयार करणारा MBA पिचवाला, आयपीएलच्या सामन्यांसाठी

अर्जेंटिनाने ३६ वर्षांनंतर विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी लाखो लोक ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि परेड थांबवण्याच आली. लोक हातात झेंडे घेऊन उत्साहाने नाचत होते आणि गात होते पण त्यांची संख्या इतकी जास्त होती की, त्यामुळे खेळाडूंची परेड खुल्या बसमध्ये थांबवून त्यांना हेलिकॉप्टरमधून परेड करावी लागली.

वाचा: सचिन… सचिन! मास्टर ब्लास्टरच्या चाहत्यांची अर्जेंटिना फॅन्सना टक्कर, VIDEO तुफान

अर्जेंटिनाची हवाई परेड

अर्जेंटिना सरकारने याला हवाई परेड म्हटले. राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीझ यांच्या प्रवक्त्या गॅब्रिएला सेरुती यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “जगज्जेता संघ हेलिकॉप्टरने उड्डाण करत परेड करत आहे कारण मोठ्या संख्येने लोक येत असल्यामुळे रस्त्यावरून परेड सुरू ठेवणे अशक्य होते,”

हेही वाचा: जनसागर नाही हा तर निळा समुद्रच! अर्जेंटिनमधील अंगावर शहारे आणणारा VIDEO

सरकारवर चाहत्यांचा राग

त्यानंतर हेलिकॉप्टरने राजधानीबाहेर असलेल्या अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या मुख्यालयाकडे उड्डाण केले. काही चाहत्यांनी त्यानंतरही रस्त्यावर आनंदोत्सव साजरा केला, परंतु १९८६ नंतर प्रथमच त्यांच्या संघाने विश्वचषक जिंकल्याची झलक पाहण्यास न मिळाल्याने अनेक चाहत्यांची निराशा झाली. टीमची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासून वाट पाहत असलेले २५ वर्षीय डिएगो बेनाविडेझ म्हणाला, ‘आम्हाला राग आला आहे, कारण आम्ही या विजयाचा आनंदोत्सव साजरा करू शकू यासाठी सरकारने योग्य व्यवस्थापन केले नाही. त्यांनी आमच्याकडून विश्वचषकाची मजा हिरावून घेतली.’

मोठ्या संख्येने चाहत्यांच्या जमावामुळे सरकारची मजबुरी समजणारे अनेक जण होते आणि त्यामुळे ते उत्सवात मग्न झाले. ३३ निकोलस लोपेझ, जो आपल्या सात वर्षांच्या मुलीसह आला, तो म्हणाला, ‘मी निराश नाहीये. आम्ही आनंद साजरा करत आहोत.

वाचा: FIFA World Cup – विजेत्या संघाला मिळणार नाही खरी ट्रॉफी, जाणून घ्या काय आहे संपूर्ण

कोणी बसमध्ये तर कोणी बसबाहेर पडले

खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या खुल्या बसमध्ये पुलावरून दोन जणांनी उडी मारल्याने परेड काही वेळातच थांबवण्यात आली. त्यातील एक बसच्या आत तर दुसरा फूटपाथवर पडला. फुटबॉल संघटनेचे प्रमुख क्लॉडिओ तापिया यांनी योजनेतील बदलासाठी सरकारी यंत्रणेला जबाबदार धरले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘आमच्यासोबत असलेले सुरक्षा कर्मचारी आम्हाला पुढे जाऊ देत नव्हते. सर्व चॅम्पियन खेळाडूंच्या वतीने मी माफी मागतो.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here