Edited by Priyanka Vartak | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Dec 2022, 3:37 pm

Elon Musk Net Worth: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांची संपत्ती यावर्षी सातत्याने कमी होत आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, २० डिसेंबर रोजी ट्विटर आणि टेस्ला सीईओ एलन मस्कच्या एकूण संपत्तीमध्ये ७.७५ बिलियन डॉलर म्हणजेच ६,४२,७३,११,३७,५०० रुपयांचे नुकसान झाले. म्हणजेच की गेल्या २४ तासांत एलन मस्कचे दर सेकंदाला ७४,३९,०१७.७९ रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

Elon Musk Net Worth
न्यूयॉर्क: ट्विटरचे नवे सीईओ एलन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पंगतीतून खाली घसरले आहेत. मस्क आता जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बर्नार्ड अर्नाल्टची एकूण संपत्ती १६१ अब्ज डॉलरची आहे, तर मस्कची एकूण संपत्ती १४८ अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. यानंतर गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावर आहे. अदानींची संपत्ती यावर्षी सर्वाधिक वाढली असून ते एकूण १२७ अब्ज डॉलरच्या मालमत्तेसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लक्षणीय म्हणजे मस्कच्या संपत्तीत यावर्षी सातत्याने घट झाली, ज्यामुळे मस्क यांना मोठा धक्का बसला. एलन मस्क यांची संपत्ती दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरली आहे.

२४ तासांत ६३ हजार कोटींचे नुकसान
एलन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत ७.७ अब्ज डॉलर्सने (६३ हजार कोटी रुपये) घट झाली आहे. एलन मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटर खरेदीचा करार पूर्ण केल्यापासून टेस्ला इंकचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. १३ डिसेंबर रोजी एलन मस्क जगातील पहिल्या क्रमांकाच्या श्रीमंतांच्या क्रमवारीतून पायउतार झाले आणि फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

टेस्लाचे शेअर्स २ वर्षांच्या नीचांकी पातळीवर
मंगळवारी जेव्हा अमेरिकन बाजार बंद झाले, तेव्हा जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार वाहन कंपनी, टेस्लाच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. तर वॉल स्ट्रीटने टेस्लाचे शेअर्स डाउनग्रेड केले. तसेच, चीनच्या कोविड निर्बंधांमध्ये शिथिलता असूनही टेस्ला विक्री कमी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दुसरीकडे, मस्क ट्विटरला निधी देण्यासाठी टेस्लामधील आपला हिस्सा कमी करू शकतात, असा गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे. यामुळे टेस्लाचे शेअर्स ८.०५ टक्क्यांनी घसरले म्हणजे १२.०७ ते १३७.८० डॉलर, जे शेअर्सका दोन वर्षातील नीचांक आहे.

दरम्यान, चालू महिन्यात टेस्लाच्या शेअर्समध्ये २९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर यापूर्वी नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी टेस्लाचा स्टॉक प्रति शेअर १९४.७० डॉलरवर बंद झाला. तेव्हापासून या शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. आकडेवारीनुसार, मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचा शेअर ८.०५ टक्क्यांनी घसरून १३७.८० डॉलर प्रति बॅरलवर घसरला. म्हणजेच डिसेंबर महिन्यात या समभागात २९.२२ टक्क्यांनी किंवा ५६.९ डॉलरची घसरण झाली आहे.

ट्विटरचे सीईओ पद सोडणार
५१ वर्षीय एलन मस्क लवकरच ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे. मस्क यांनी त्यांच्या ताज्या ट्विटमध्ये म्हटले की, त्यांची बदली सापडल्यावर मी पद सोडणार आहे. मस्कने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “जेव्हा मला या नोकरीसाठी कोणी मूर्ख सापडेल तेव्हा मी सीईओ पद सोडेन! यानंतर मी फक्त सर्व्हर आणि सॉफ्टवेअर टीम हाताळणार आहे.” एक दिवसापूर्वी मस्क यांनी ट्विटर पोलद्वारे त्यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडावे की नाही? असा प्रश्न विचारला होता. मस्कच्या पोलला उत्तर देतील बहुतेक ५८% वापरकर्त्यांनी होय असे उत्तर दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here