प्रसाद लाड यांच्या आईबद्दल अश्लील कमेंट करणाऱ्याविरोधात चुनाभट्टी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन संबंधिताला ताब्यात घेतले आहेत. चुनाभट्टी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.

 

Prasad lad1
प्रसाद लाड (भाजप आमदार)
मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या आईविरोधात फेसबुकवर अश्लिल संदेश सोशल मिडीयावर टाकल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मयुर एन बोरोले असं त्याचं नाव आहे. चुनाभट्टी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.

मयुर बोरोले याने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून ४ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान आमदार प्रसाद लाड यांच्या आईविषयी अश्लिल पोस्ट करून त्यांची बदनामी केली होती. आमदार प्रसाद लाड यांचे स्वीय सहायक देविदास नारायण मंगवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. चुनाभट्टी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ नुसार हा गुन्हा दाखल केला आहे. चुनाभट्टी पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

  • प्रसाद लाड भाजपचे आमदार आहेत, फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळख
  • नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा सनसनाटी विजय
  • याआधी राष्ट्रवादीत होते, अजित पवार यांच्या विश्वासातले म्हणून ओळख होती
  • राष्ट्रवादीत काही मतभेदांमुळे २०१६ साली प्रसाद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here