अमरावती : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता लिव्ह इनसंदर्भातही अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अमरावती जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर तरूण गर्भवती राहिल्यावर तिला गर्भपात कर अन्यथा तुला मारून टाकेन, अशी धमकी दिल्याने तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. अविनाश लक्ष्मण मगीरवार (वय ३७. रा. कुंटुर, नांदेड), असे या तरूणाचे नाव आहे.

या प्रकरणी लिव्ह इन पार्टनरने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये १९ तारखेला तक्रार दिली. यानंतर आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही प्रेमी युगूल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तसेच यातील तरूणाने पिडित तरूणीला लग्नाचे आमिष दिले होते. तसेच तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. यातून ती तरूणी गर्भवती राहिली.

उद्यापासून भरणार हुडहुडी?; राज्यातील या भागांत पुढील पाच दिवस थंडीचा कडाका जाणवणार
पीडित तरूणी ही गर्भवती राहिल्यावर या तरूणाने तिला गर्भपात कर अन्यथा जीवे मारेन, अशी धमकी दिली. अविनाश आणि पीडित तरूणीची जानेवारी २०१९ मध्ये अमरावती येथील ३२ वर्षीय तरूणीसोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर हे मैत्रीत झाले. यानंतर अविनाश आणि पीडित तरूणी हे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहू लागले.

यानंतर अविनाशने या तरूणीला लग्नाचे आमिषही दिले होते. तसेच अनेक वेळा दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती तरूणी गर्भवती झाल्यावर त्याने तिला गर्भपात करण्याचे सांगत नाही केला तर ‘तुला जीने ठार मारेन,’ अशी धमकी दिली. यानंतर तरूणीने अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोठी बातमी! महामुंबईत २९६ सीएनजी पंपची उभारणी करणार; या शहरातील मुख्य रस्त्यांवर सुविधा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here