Omicron Bf7 Variant Symptoms: कोरोना विषाणू सातत्यानं म्युटेट होत आहे. म्युटेशन होत असल्यानं लक्षणं बदलत आहेत. करोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतरही काही जणांना विषाणूची लागण होत आहे. सर्वसामान्यपणे अनेक साधारण लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र ही लक्षणं करोनाची असू शकतात.

हायलाइट्स:
- जगावर पुन्हा एकदा करोना संकट
- चीनसह अनेक देशांत करोना रुग्णसंख्या वाढली
- भारतात नव्या व्हेरिएंटचे चार रुग्ण
कोरोना विषाणू सातत्यानं म्युटेट होत आहे. म्युटेशन होत असल्यानं लक्षणं बदलत आहेत. करोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतरही काही जणांना विषाणूची लागण होत आहे. सर्वसामान्यपणे अनेक साधारण लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र ही लक्षणं करोनाची असू शकतात. ब्रिटिश हेल्थ स्टडी ऍप ZOE वर करोनाबाधितांनी त्यांची काही लक्षणं सांगितली आहेत.
करोना महामारी सुरू झाल्यापासून ZOE ऍप सातत्यानं कोविडच्या लक्षणांची माहिती देत आहे. वेळेनुसार लक्षणं बदलत जात आहेत. त्यांची माहिती ऍपवर उपलब्ध करून दिली जात आहे. विषाणू सातत्यानं म्युटेट होत असल्यानं तो अधिक संक्रामक होत आहे. साधारण वाटल्यानं दुर्लक्ष केली जाणाऱ्या शारीरिक समस्या करोनाची लक्षणं असू शकतात.
करोनाची लक्षणं खालीलप्रमाणे-
– घशात खवखव
– शिंका
– वाहणारं नाक
– नाक चोंदणं
– कफ नसलेला खोकला (कोरडा खोकला)
– डोकेदुखी
– कफसोबत खोकला
– बोलताना होणारा त्रास
– मांसपेशींमध्ये वेदना
– वास न येणं
– अधिक ताप
– थंडी भरून ताप
– सततचा खोकला
– श्वास घेताना त्रास
– थकवा जाणवणं
– कमी झालेली भूक
– अतिसार
– आजारी पडणं
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Get India news, latest marathi news headlines from all states of India. Stay updated with us to get latest India news in marathi.