औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे सोमवारी सायंकाळी राहत्या घरामागे असलेल्या शौचालयाच्या टाकीमध्ये एका २८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या पती व सासूला ताब्यात घेतले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांच्या तपासात वेगळे कारण समोर आलं आहे. महिलेच्या दिरानेच तिची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबंध निर्माण झाले आणि यातून महिला सतत पैशांची मागणी करत असल्याने तिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली आरोपी दिराने दिली आहे. माया आगलावे असे मृत महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर आगलावे असे आरोपीचे नाव आहे.

वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील माया आगलावे यांच्या घरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीत त्यांच्या मृतदेह आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आपल्या जावयाने आणि त्याच्या आईनेच ही हत्या केली असल्याची माहिती माया यांच्या आईने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी मायाच्या पतीला आणि सासूला ताब्यात घेतले होते. तसेच माया यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्या दिशेने तपास करत होते.

फोन टॅपिंग प्रकरणी विधानसभेत राडा, नाना पटोले भिडले, अजित पवार अध्यक्षांना नडले!
पोलीस माया यांच्या हत्येचा तपास करत असतानाच त्यांना एक माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्या दिशेन तपाला सुरुवात केली. मृत माया आणि त्यांचा चुलत दीर ज्ञानेश्वर आगलावे यांच्यात अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यातूनच हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ ज्ञानेश्वरला ताब्यात घेऊन, पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी ज्ञानेश्वरची प्राथमिक चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे अखेर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्या आणि ज्ञानेश्वरने सर्व आरोपांची कबुली दिली. मायाची हत्या आपणच केली असल्याची कबुली देखील त्याने दिली. आधी गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी ज्ञानेश्वरला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली.

चार महिन्यांपूर्वी दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबंध निर्माण झाले. पण पुढे मायाकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने ज्ञानेश्वर त्रस्त झाला होता. तर पैसे दिले नाही तर बलात्काराचा आरोप करुन समाजात बदनाम करण्याची धमकी देखील मायाकडून मिळत होती. दरम्यान सोमवारी १९ डिसेंबरला मायाने पुन्हा २० हजारांची मागणी केली. पण पैसे नसल्याचे सांगून, देखील माया समजून घेत नव्हती. तसेच पुन्हा बदनामी करण्याची धमकी देत असल्याने ज्ञानेश्वरने तिचा गळा आवळून हत्या केली.

करोनावर सर्वात अचूक भविष्यवाणी करणाऱ्या IIT कानपूरने केला मोठा दावा; भारतात लॉकडाऊन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here