शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंचे आरोप संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. शेवाळेंच्या आरोपांचा खासदार संजय राऊतांनी जोरदार समाचार घेतला आहे. राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठी भाषेत हलकटपणा आणि नीचपणा म्हणतात, अशा शब्दांत राऊत यांनी शेवाळेंवर जोरदार टीका केली.

हायलाइट्स:
- शेवाळेंच्या आरोपांचा खासदार राऊतांकडून समाचार
- हा तर हलकटपणा; राऊतांची घणाघाती टीका
- शेवाळेंचे जुने व्हिडीओ पुन्हा व्हायरल
राहुल शेवाळेंचे आरोप संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. शेवाळेंच्या आरोपांचा खासदार संजय राऊतांनी जोरदार समाचार घेतला आहे. ‘राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठी भाषेत हलकटपणा आणि नीचपणा म्हणतात. सुशांतसिंह राजपूत प्रकरण तेव्हाच्या विरोधी पक्षानं आम्ही सत्तेत असताना उभं केलं आणि शेवटी ते त्यांच्यावरच उलटलं. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक तपास यंत्रणांनी केला. सुशांतसिंह राजपूत यांचा मृत्यू आत्महत्याच होती हे सीबीआयनं सांगितलं आहे,’ अशा शब्दांत राऊत यांनी शेवाळेंचा समाचार घेतला.
दुसऱ्या बाजूला राहुल शेवाळेंचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शेवाळेंवर जुलैमध्ये बलात्काराचे आरोप झाले. त्यांची तक्रार एका तरुणीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली. यानंतर शेवाळेंनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी शेवाळेंचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यात शेवाळे तरुणीला किस करताना दिसत होते. आता शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर टीका करताच जुने व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.