पालघरमधील गावात राहणारी मुलगी शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास मैत्रिणीकडून मोबाईल आणण्यासाठी घराबाहेर पडली. बाजारातून जात असताना तिला एक मित्र भेटला. पीडिता त्याला ४ महिन्यांपासून ओळखत होती. मित्र तिला घरापर्यंत सोडतो म्हणाला. पीडिता तयार झाली. मात्र तो तिला एका बंगल्यात घेऊन गेला.

 

palghar crime

हायलाइट्स:

  • पालघरमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार
  • सर्व ९ आरोपींना पोलिसांकडून अटक
  • पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पालघर: एका १५ वर्षीय मुलीवर पालघरमधील रिकाम्या बंगल्यात सामूहिक बलात्कार झाल्याची घटना गेल्या शुक्रवारी घडली. सहा जणांनी पीडितेवर आठवेळा बलात्कार केला. तर तिघांनी बलात्काराचा प्रयत्न केला. या प्रकरणातील सर्व ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधान आणि पॉस्को अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरमधील गावात राहणारी मुलगी शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास मैत्रिणीकडून मोबाईल आणण्यासाठी घराबाहेर पडली. बाजारातून जात असताना तिला एक मित्र भेटला. पीडिता त्याला ४ महिन्यांपासून ओळखत होती. मित्र तिला घरापर्यंत सोडतो म्हणाला. पीडिता तयार झाली. मात्र तो तिला एका बंगल्यात घेऊन गेला. तिथे त्याचे दोन मित्र आधीपासूच हजर होते. ते दोघे दारू पित होते.
रात्रीच्या मिट्ट काळोखात चालकानं ट्रेनचा ब्रेक दाबला अन् महिलेचा कट उधळला; गुन्ह्याचा उलगडा
काही वेळानंतर तीन आरोपींनी मुलीकडचा मोबाईल खेचून घेतला आणि आळीपाळीनं तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. संध्याकाळी उशिरा आणखी तीन जण बंगल्यावर पोहोचले. पीडितेनं गयावया केली. त्यावर एकानं तिला बाईकवर बसवले. मात्र काही वेळानंतर तो तिला पुन्हा बंगल्यावर घेऊन आला. यानंतर चौघे तिला समुद्र किनारी घेऊन गेला. तिथे त्यांनी मुलीवर अत्याचार केले.

मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी दारू पित होते. त्यावेळी मुलीनं कसाबसा तिचा मोबाईल मिळवला आणि घरी फोन केला. हा कॉल अवघ्या काही सेकंदांचा होता. ती हुंदके देत होती. मुलगी काही बोलणार इतक्यात आरोपींपैकी एकानं तिचा फोन खेचला. यानंतर कुटुंबीयांनी अनेकदा मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आरोपीनं कॉल कट केले. त्यानंतर फोन स्विच्ड ऑफ केला. कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं.
पतंजलीची ऑनलाईन बैठक; देश-विदेशातील अनेक जण हजर; पुण्यातून पॉर्न व्हिडीओ सुरू झाला अन्…
शनिवारी सकाळी बंगल्यावर आणखी दोघे जण आले. त्यांनी मुलीवर बलात्कार केला. दुपारच्या सुमारास आरोपींनी मुलीच्या फोनवरून तिच्या मैत्रिणीला मेसेज केला. तुझ्या मैत्रिणीचं अपहरण झालं आहे अशा स्वरुपाचा मेसेज आरोपींनी पाठवला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी दुपारी २ च्या सुमारास पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपींनी मुलीला सोडलं. मात्र मुलगी घरी गेली नाही. ती तिच्या घराजवळ असलेल्या एका झाडाखाली बसून राहिली. तिथेच पोलिसांना ती सापडली. पोलिसांनी मुलीला विश्वासात घेतलं. त्यानंतर तिनं झालेला संपूर्ण प्रकार कथन केला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

47 COMMENTS

  1. erectile dysfunction pills [url=http://cheapestedpills.com/#]over the counter erectile dysfunction pills[/url] male erection pills

  2. where can i get cheap mobic without a prescription [url=https://mobic.store/#]get generic mobic prices[/url] cost of cheap mobic without rx

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here