Mukta Tilak Death News : पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं निधन झालं आहे. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या.

हायलाइट्स:
- पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
- गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते.
- आज दुपारी साडे तीन वाजता मुक्ता टिळक यांनी गॅलेक्सी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मुक्ता शैलेश टिळक २०१९ च्या राज्य निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या. महापौर म्हणून केलेल्या कामावर खूश होऊन पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. गिरीश बापट यांच्या कसबा मतदारसंघातून त्यांनी दणक्यात विजय मिळवून विधानसभेत पाऊल ठेवलं. पण त्याचवेळी त्यांनी कर्करोगाची लागण झाली. पुढे दोन ते अडीच वर्ष त्यांना कर्करोग आणि अनेक व्याधींनी ग्रासलं होतं. त्यामुळे सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर अतिशय कमी झाला होता.
मुक्ता टिळक ह्या पुण्याच्या मुलीच्या भावे स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांचे पदवीपर्यंतचे कॉलेजचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले होते. मानसशास्त्र विषयातून एम.ए झालेल्या मुक्ताताईंनी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचे शिक्षण घेतले होते. त्या मार्केटिंग विषयाच्या एमबीए होत्या शिवाय त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.