Maharashtra Assembly Winter Session : राज्यातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचाविण्यासाठी विधानसभेत प्रश्न मांडण्यात येतात. मात्र विधानभवन (Vidhan Bhavan Nagpur)परिसरातच निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्यामुळे माजी मंत्री यांना रुग्णालयात सोडून आल्यानंतर रुग्णवाहिकेचे चाक विधानभवन परिसरातील चेंबरमध्ये फसले. ही रुग्णवाहिका माजी मंत्र्यांना खासगी रुग्णालयात सोडून आली होती. मात्र त्यांना सोडण्यासाठी जाताना ही घटना घडली असती तर काय घडणाऱ्या घटनेची जबाबदारी कोणी स्विकारली असती असा प्रश्न उपस्थित होतो.
नागपूरात कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन होत आहे. राज्यभरातून येणारे मंत्री- आमदार आणि कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाचे काम केल्याने आमदाराच्या जीवावर बेतले असते. महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांना अस्थमाचा त्रास आहे. त्यांना श्वास घेण्यात अडचणी येत असल्याने त्यांना विधानभवन परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्याचे सूचवले. त्यानंतर त्यांना नागपुरातील विवेका हॉस्पिटलमध्ये (Hospital) भरती करण्यात आले. सध्या पाचपुते यांच्यावर सुभाषनगर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र त्यांना खासगी रुग्णालयात सोडून आल्यानंतर विधानभवन परिसरात रुग्णवाहिकेचे चाक विधानभवनासमोरच असलेल्या चेंबरमध्ये फसले.
कालच करण्यात आली होती चेंबरची दुरुस्ती
News Reels
विधानभवन समोर असलेल्या चेंबरचे झाकण अधिवेशनाच्या (Winter Assembly Session) पहिल्या दिवसापासूनच तुटलेले होते. त्यानंतर बुधवारी अधिवेशनाचे सत्र संपल्यानंतर सायंकाळी चेंबरवर फ्रेम आणि त्याचे झाकण अलगत ठेवण्यात आले होते. यासंदर्भात एबीपी माझाने बुधवारी विचारणा केल्यावरही कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती. मात्र आज दुपारी याच चेंबरवर रुग्णवाहिकेचे चाक फसले. याशिवाय परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे.
कृत्य लपविण्यासाठी ‘गार्डन’
चेंबरवर अलगद ठेवण्यात आलेल्या झाकणामुळे रुग्णवाहिकेचे चाक फसले होते. परिसरातील नागरिकांना धक्का मारुन या रुग्णवाहिकेला बाहेर काढले. मात्र ही घटना सर्व माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात असलेल्या अधिकाऱ्यांनी लगेच त्या चेंबरवर सिमेंटचं दुसरं मोठं झाकण ठेवून त्याच्या चारही बाजूने फुलांची रोप ठेवून त्याची बागच तयार केली. चूक लपविण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेल्या चमकोगिरीची चर्चा विधानभवन परिसरात होती.
ही बातमी देखील वाचा
Excellent Customer Support Service. Quantum Ꭺi Helped mе throᥙgh unfamiliar Ground аnd guided mе throujgh the process ԝith excellent
assistance.