मुंबई: भाजपचे आमदार यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते यांचं जोरदार कौतुक केलं आहे. त्यांनी फडणवीस यांना योद्ध्याची उपमा दिली आहे. ‘आमचा योद्धा इतका फिरला की सत्ताधाऱ्यांची हवा निघाली,’ असं ट्विट नीतेश राणे यांनी केलं आहे. (BJP MLA praises opposition Leader )
देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नीतेश राणे यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कर्तृत्ववान, संवेदनशील, कार्यतत्पर, प्रभावशाली, कणखर नेतृत्व, अभ्यासपूर्ण दूरदृष्टी असलेले नेते अशा शब्दांत नीतेश यांनी फडणवीसांचा गौरव केला आहे. तत्पूर्वी, केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी फडणवीसांच्या करोना काळातील कार्याचं कौतुक केलं आहे. तसंच, सत्ताधाऱ्यांवर नाव न घेता टीका केली आहे. ‘आमचा योद्धा इतका फिरला की एसी चालू न करताच अनेकांची हवा निघाली, असं त्यांनी म्हटलं आहे. ‘काहीही करा, चिरफाड तर होणारच,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वाचा:
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times