सेलिब्रिटी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. याच माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळेच अनेकदा सेलिब्रिटी आस्क मी ऍनिथिंग सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. दिलखुलास उत्तरांमुळे चाहते आणि स्टार्सचं नातं आणखी घट्ट होतं. आता असाच काहीसा प्रकार सनी लिओनी आणि तिच्या चाहत्यासोबत घडला आहे. स्वत:ला सनीचा चाहता सांगणाऱ्या ए. एम. खान नावाच्या तरुणानं सिगारेट ओढण्याची सवय मोडण्यासाठी एक अट ठेवली.

पाकिस्तानचा रहिवासी असलेल्या ए. एम. खाननं त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली. जर सनी लिओनीनं मला रिप्लाय केला तर मी सिगारेट सोडेन, असं खाननं पोस्टमध्ये नमूद केलं होतं. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. विशेष म्हणजे खानच्या पोस्टवर दस्तुरखुद्द सनी लिओनीनं रिप्लाय केला. ‘…मग तू सिगारेट केव्हा सोडतो आहेस?’ असा प्रश्न सनीनं विचारला. सनीचा हा रिप्लाय व्हायरल झाला. सनीचा रिप्लाय १२ हजारांहून अधिक जणांनी लाईक केला आहे.

sunny


पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर तरुणानं पोस्ट एडिट केली आणि नवं कॅप्शन लिहिलं. यानंतर आता सोशल मीडियावर आपापल्या आवडत्या सेलिब्रिटीला टॅग करून धूम्रपान सोडण्याबद्दल बोलू लागले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वेगळाच ट्रेंड सुरू झाला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here