टेक्सास: कधी कसं कोणाचं नशीब चमकेल काही सांगता येत नाही. असंच काहीसं या महिलेसोबत घडलं जेव्हा अचानक तिच्या खात्यात एक-दोन नव्हे तर चक्क २७० कोटी रुपये आले. नक्कीच इतका मोठा आकडा पाहून तुमच्याही भूवया उंचावल्या असतील. कोणाच्या तरी चुकीमुळे एका महिलेच्या बँक खात्यात अचानक २७० कोटी रुपये आले आणि तिचं नशीब पालटलं. खरंतर या महिलेने अत्यंत प्रामाणिकपणा दाखवत ती संपूर्ण रक्कम परत केली. मात्र या घटनेनंतर महिलेचे आयुष्यच बदलून गेले. सध्या या महिलेची कहाणी जगभरात चर्चेत आहे. यानंतर महिलेने स्वतःची एक कंपनी सुरू केली.

२०१९ मध्ये रुथ बलून प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिच्या बँक खात्यात अचानक २७० कोटींहून अधिकची रक्कम आली. तेव्हा रुथ अमेरिकेतील टेक्सासमधील डलास येथे चपलांच्या दुकानात काम करत होती.

या घटनेला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. रुथने आता स्वतःची एक कंपनी उघडली आहे आणि ही कंपनी मुलांना मनोरंजन पुरवते, मुलांसाठी पार्टी आयोजित करते. रुथची मैत्रीण इवा ब्रँडेस या व्यवसायात भागीदार आहे. ते मुलांसाठी बबल बससह त्या पार्टी देतात ज्यामध्ये बबल आणि फोम स्प्रे केला जातो. ज्यामध्ये लहान मुलं खूप एन्जॉय करतात.

ruth balloon

जेव्हा अचानक खात्यात आले २७० कोटी

खात्यात अचानक आलेल्या २७० कोटींच्या रकमेबद्दल रुथ म्हणाल्या होत्या की, सुरुवातीला त्यांना कोणीतरी ते गिफ्ट दिल्याचं त्यांना वाटलं होतं. यानंतर त्यांनी बँकेला याबाबतची माहिती दिली. तेव्हा बँकेने रुथला ही रक्कम चुकून तिच्या खात्यात आल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर रुथ काही काळसाठीच पण कोट्यवधी रुपयांची मालकिन बनली होती. डलासमध्ये राहणाऱ्या रुथने नंतर लेगसी टेक्सास बँकेला ते पैसे प्रामाणिकपणे परत केले.

पैशांचं काय करणार याचंही प्लानिंग केलं होतं

रुथने सांगितले की, जेव्हा ही रक्कम तिच्या खात्यात आली तेव्हा तिने त्यातील १० टक्के चर्चला दान करण्याचा विचार केला होता आणि काही रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवायची असा विचार केला होता.

जेव्हा चुकून खात्यात आलेले ६ कोटी व्यक्तीने खर्च केले

खात्यात अचानक इतकी मोठी रक्कम येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या खात्यात अचानक ६ कोटी रुपये आले होते. मात्र, या व्यक्तीने हे पैसे बँकेला परत न करता उधळले होते. अब्देल घडिया नावाची व्यक्ती ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे राहत होती. अचानक त्यांच्या खात्यात मोठी रक्कम आली आणि त्याने ती खर्चही केली. या गुन्ह्यामुळे त्याला शिक्षाही झाली होती. एका जोडप्याने नवीन घर घेतले होते आणि ते या घरासाठी पैसे देत होते. मात्र, चुकून त्यांचे पैसे अब्देल घाडियाच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते आणि त्याने काहीही विचार न करता हे पैसे खर्च केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here