कोल्हापूर : २५वा वाढदिवस साजरा करण्याची लगबग सुरु असतानाच हृदविकाराच्या तीव्र झटक्याने शिंगणापूरच्या प्रणव प्रकाश पाटील याचा जीवनप्रवास अर्ध्यावरच थांबला. पाटील कुटुंबीय आणि प्रणवच्या मित्रांनी व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवून प्रणवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, पण दुर्दैवाने काही तासातच श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवावा लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर आजोळच्या मदतीने हिंमतीने आईला आधार दिला. स्व:च्या कमाईतून घर उभं केलं. लग्न झालं. आता बहिणीच्या अंगाला हळद लावायची तयारी सुरु होती, पण काळाने असा घात केला.

दुर्दैवाने वडिलांचे छत्र हरपले आणि कमी वयातच घराची जबाबदारी खांद्यावर आली. आजोळच्या मदतीने त्याने संकटावर मात केली. शिक्षण पूर्ण केले आणि फायनान्स कंपनीत रूजू झाला. मेहनती, प्रामाणिक असलेल्या प्रणवने त्याच्या कतृत्वाच्या जोरावरच अनेकांच्या मनात स्वत:साठी जागा निर्माण केली होती.

IPL Auction मध्ये रेकॉर्डब्रेक बोली, दीडवरून थेट मिळाले १३ कोटी, पाहा कोणाला लागली लॉटरी

दीड वर्षांपूर्वीच प्रणवने चंबुखडी परिसरात नवे घर घेतले होते. नवीन घरातील दुसरा वाढदिवस साजरा करायाचा म्हणून त्याने गुरूवारी कार्यालयातून सुट्टी घेतली. वाढदिवसाची तयारी सुरु असताना नियतीच्या मनात मात्र काही औरच होतं. गुरुवारी सकाळीच प्रणवच्या छातीत दुखू लागले. खासगी रुग्णालयात जाऊन त्याने उपचार घेतले. ईसीजी ठीक असल्याने डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्याने दुपारी घरी आराम केला. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अचानक छातीत कळ आली आणि बोलता-बोलता प्रणव कोसळला.

काही क्षणातच तो बेशुद्ध पडल्याचे पाहून त्याची आई, पत्नी आणि बहिणीचे हात-पाय गळाले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी शेजाऱ्यांचा मदतीने प्रणवला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. पण तोपर्यंत प्रणवची प्राणज्योत मालवली होती. अवघ्या २५ वर्षांच्या उमद्या तरुणाचा असा आकस्मिक मृत्यू झाला.

राज ठाकरेंनी विधिमंडळात जाऊन मुख्यमंत्र्याची भेट घेतली, भेटीचा तपशील गुलदस्त्यात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here