husband kills wife: गुजरातच्या सूरतमध्ये एका शिपायानं कंडक्टर पत्नीची बसमध्ये हत्या केली. धारदार शस्त्रानं पतीनं पत्नीचा गळा कापला. त्यानंतर पतीचा राग शांत झाला नाही. त्यानं पत्नीवर धारदार शस्त्रानं सपासप वार केले. त्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. घाबरलेले प्रवासी बसमधून उतरले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

अमृत रथवाची पत्नी मंगुबेन छोटा उदयपूरमध्ये जीएसआरटीसीमध्ये (गुजरात राज्य रस्ते वाहतूक महामंडळ) कंडक्टर म्हणून कार्यरत होती. पती, पत्नी २१ डिसेंबरला एकाचवेळी ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघाले. पत्नीची हत्या करण्यासाठी पतीनं २०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापलं. पत्नीची बस भिखापूर गावाजवळ पोहोचल्यावर पती धारदार शस्त्र घेऊन बसमध्ये चढला. त्यानं बसमध्येच पत्नीचा गळा कापला. हा प्रकार पाहून बसमधील प्रवासी घाबरले. सगळे प्रवासी बसमधून उतरले.
पत्नीचा गळा कापल्यानंतरही पतीचा राग शांत झाला नाही. त्यानं तिच्यावर अनेक वार केले. बसमध्ये रक्ताचा सडा पडला. हत्या केल्यानंतर पती फरार न होता पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. थोड्याच वेळात घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी आरोपीला अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://www.binance.com/es/register?ref=GJY4VW8W