पुणे : पहिली पत्नी असताना सोशल मीडियावरून ओळख झालेल्या दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा त्याच्या मुलांनीच खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. सुजित बनसोडे ( वय २१) आणि अभिजित बनसोडे (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून धनंजय बनसोडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण परिसरात बनसोडे कुटुंब वास्तव्यास आहे. धनंजय बनसोडे हे गायब झाल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलांनीच अत्यंत शिताफीने वडिलांचा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे.

कंडक्टर बायकोचा काटा काढण्यासाठी पोलिसाचा २०० किमी प्रवास; संपवून शेजारी बसला; बसमध्ये खळबळ

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियाचा वापर करता करता धनंजय बनसोडे यांची नागपूर येथील एका महिलेशी ओळख झाली. नंतर या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. याविषयी धनंजय बनसोडे यांच्या मुलांना कुणकुण लागली होती. त्यामुळे कुटुंबात नेहमी वाद होत असत. या संदर्भात धनंजय बनसोडे यांनी नागपूर येथील प्रेयसीला आपले संबंध माझ्या घराच्यांना मान्य नाहीत. त्यातून मुले माझा घातपात करतील, असे सांगितले होते.

पोलिसांनी तपास सुरू केला असता अनेक गोष्टी समोर आल्या. पोलिसांना हा घातपाताचा प्रकार वाटल्याने त्यांनी बनसोडे यांच्या दोन्ही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आम्हाला आमच्या वडिलांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे आमच्या घरात नेहमी वाद होत होते. या रागातूनच आम्ही वडिलांना संपवल्याची कबुली मुलांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास म्हाळुंगे पोलीस करत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here