मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील एका कुटुंबानं विष घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दोन महिला आणि एका पुरुषानं विष घेतलं. मुंबईतील एक कथित अभिनेत्री त्रास देत असल्यानं विष घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे तरुणीदेखील समोर आली आहे. तिनं शोषणाचा आरोप केला आहे.

 

mp crime
उज्जैन: मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील एका कुटुंबानं विष घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दोन महिला आणि एका पुरुषानं विष घेतलं. मुंबईतील एक कथित अभिनेत्री त्रास देत असल्यानं विष घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे तरुणीदेखील समोर आली आहे. तिनं शोषणाचा आरोप केला आहे. आपण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा दावाही तिनं केला.

उज्जैनमध्ये वास्तव्यास असलेल्या आशी खान यांचा व्हिडीओ समोर आला आहे. आशी खान यांच्यासोबत त्यांची आई परवीन आणि पत्नी इशा खान यांनीदेखील विष घेतलं. मुंबईत राहणारी, स्वत:ला अभिनेत्री म्हणवणारी तरुणी सातत्यानं त्रास देत असल्याचं तिघांनी सांगितलं. कथित अभिनेत्रीनं आधी मुंबई आणि त्यानंतर उज्जैनच्या महाकाल पोलीस ठाण्यात आशी खानविरोधात कलम ३७६ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. दोन्हीवेळा अभिनेत्रीनं जामिनाच्या नावाखाली लाखो रुपये वसूल केल्याचा आरोप खान कुटुंबानं केला. अभिनेत्रीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विष घेत असल्याचं कुटुंबानं सांगितलं. विष घेणाऱ्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संपत्ती, जमीन अन् असुया; निष्पाप मुलाचा नाहक जीव गेला; शोधाशोध करणारा काकाच निघाला गुन्हेगार
खान कुटुंबानं आरोप केल्यानंतर संबंधित तरुणीदेखील पुढे आली आहे. आशी खान आणि त्याचे कुटुंबीय माझ्यावर खोटा आरोप करत आहेत. ते मला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिनं म्हटलं. मुंबई आणि उज्जैन दोन्ही प्रकरणांमध्ये आशी खानचा जामीन मीच केला. कारण मी आशीवर खूप प्रेम करते. मी त्याच्या मुलाची आई होणार आहे. आशी आधीपासूनच विवाहित असल्याचं मला माहीत नव्हतं. मला तर केवळ त्याच्यासोबत राहायचं आहे. मात्र जामीन झाल्यावर त्यानं शब्द फिरवला आणि मला खोटं ठरवण्यासाठी विष घेतल्याचं ढोग करत आहे, असं तरुणीनं म्हटलं.
अरेरे! भावंडांसोबत अभ्यास करत होती चिमुरडी; पेन्सिलला टोक काढताना आक्रित घडलं, करूण अंत
आशी खान मुंबईतील ओशिवरामध्ये कपड्यांचा व्यवसाय करतो. आरोप करणाऱ्या तरुणीसोबत तो दोन वर्षे लिव्ह इनमध्ये होता. तरुणी गुवाहाटाची रहिवासी आहे. लग्नास नकार दिल्यानंतर प्रकरण समोर आलं. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये तरुणीनं आशीविरोधात मुंबईत बलात्काराची तक्रार नोंदवली. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायमूर्तींनी आशीची रवानगी कोठडीत केली. त्यानंतर आशीला जामीन मिळाला. मग तो उज्जैनला गेला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Get India news, latest marathi news headlines from all states of India. Stay updated with us to get latest India news in marathi.

1 COMMENT

  1. Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here