गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईचे अधिकाऱ्यांसोबत प्रत्येक महिन्याला आढावा बैठका घेत आहेत. त्याला क्राइम कॉन्फरन्स म्हटलं जातं. या बैठकीला प्रत्येक पोलीस ठाण्याचे, गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपासून डिसीपी, अॅडिशनल सीपी आणि ज्वॉइंट सीपींना येणं बंधनकारक असतं. मात्र, करोनामुळे या बैठका बंद करण्यात आल्या आहेत.
पूर्वी आम्ही पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नियमित आढावा बैठकांना जायचो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत. या बैठकांना डीसीपी आणि अॅडिशनल सीपीही असतात. आता ज्वॉइंट सीपीही अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच अधिकाऱ्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावतात. फोन कॉल्स किंवा व्हिडिओ कॉल्सवरूनच महत्त्वाच्या सूचना देण्यावर आता भर देण्यात येत आहेत, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. गेल्या आठवड्यात मुख्यालयात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली होती. तर दोन महिन्यांपूर्वी एका डिसीपीलाही करोनाची लागण झाली होती.
आतापर्यंत संपूर्ण राज्यात एक डझनहून अधिक पोलिसांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर हजाराहून अधिक पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळेच पोलीस दलात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेण्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागात पोलिसांचा एकमेकांचा संपर्क न होणं ही अशक्य प्राय गोष्ट आहे. नाकाबंदी, बंदोबस्त, एखाद्या केसबाबतचं डिटेक्शन आदी कारणांसाठी त्यांना एकमेकांना भेटावंच लागतं. पण ज्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेणं शक्य आहे, त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर भर देण्यात येत असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत ८२ पोलिसांचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यात एकट्या मुंबईतच आतापर्यंत ४८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पालघरमध्ये सुमारे ३० करोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत १३० पोलीस करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तसेच नवी मुंबईत आतापर्यंत १८३ पोलिसांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ५२ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांच्या कुटुंबातील १०१ जणांवर उपचार करण्यात आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times