Rail Roko Andolan At Asangaon: मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गांवर आसनगाव स्थानकात संतप्त रेल्वे प्रवाशांनी आज सकाळी आठच्या सुमारास रेल रोको आंदोलन केले. मुंबई सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलपूर्वी मेल एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जाते. यामुळं प्रवासी संतप्त झाले होते.

 

mumbai local

हायलाइट्स:

  • आसनगाव स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको
  • स्थानकात लोकलसमोर आंदोलन
  • उशीरा येणाऱ्या गाड्यांमुळं प्रवासी हैराण
कल्याणः मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गांवर आसनगाव स्थानकात संतप्त रेल्वे प्रवाशांनी आज सकाळी आठच्या सुमारास रेल रोको आंदोलन केले. मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरले होते. (Mumbai Local News)

सकाळी कसाऱ्याहून मुंबई सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलपूर्वी मेल एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जाते यामुळे लोकल वाहतूक काही अंशी उशिराने चालू राहत असते. यामुळे मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना त्यांच्या कार्यालयात पोहचायला उशीर होतो. रोज होणाऱ्या अशा घटनेमुळं संतप्त रेल्वे प्रवाशांनी आज आसनगाव स्थानकात लोकलसमोर आंदोलन केले. कंट्रोलरुमवरुन जशा सुचना येतात त्यानुसार आम्हाला कामं करावं लागतं. आमच्या हातात काही नाही, असं स्टेशन मास्तरांनी म्हटलं आह

वाचाः पुणेः अंडाभुर्जीची ऑर्डर नाकारली, आरोपीने थेट गावठी कट्टा काढला अन्…

कल्याण – कसारा रेल्वे वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी रेल्वे कंट्रोलसोबत बोलण्याच्या प्रयत्न केला असता कंट्रोल रुम थातूर मातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला. आम्ही यापुढे लोकल सेवा उशीर होणार नाही, असा पुढील काळात प्रयत्न करु असं सांगण्यात आलं. सदर माहिती कल्याण कसारा वेल्वफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवाजी भोईर यांनी दिली.

वाचाः मुख्यमंत्री सशर्त कक्षेत! चौकशीसाठी लोकायुक्तांना घ्यावी लागणार विधानसभेची पूर्वपरवानगी

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here