मंगळुरूच्या कटेलु सरस्वती सदनात त्रिजन्म मोक्ष यक्षगानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात ५८ वर्षीय गुरुवप्पा बयारू शिशुपालाची भूमिका साकारत होते. यावेळी बयारू अचानक मंचावर कोसळले. त्यांना तातडीनं मंगळुरूतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

dance death
मंगळुरू: व्यासपीठावर, लग्नात नाचताना हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यूमुखी पडल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घडत आहेत. आता कर्नाटकच्या मंगळुरूत एका व्यक्तीचा मंचावर मृत्यू झाला आहे. मंचावर नाचत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे कलाकाराचा मृत्यू झाला.

मंगळुरूच्या कटेलु सरस्वती सदनात त्रिजन्म मोक्ष यक्षगानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात ५८ वर्षीय गुरुवप्पा बयारू शिशुपालाची भूमिका साकारत होते. यावेळी बयारू अचानक मंचावर कोसळले. त्यांना तातडीनं मंगळुरूतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुअप्पा बयारू कटेलु श्री दुर्गापरमेश्वरी कृपापोषित यक्षगण मंडळातील कलाकार होते.
कंडक्टर बायकोचा काटा काढण्यासाठी पोलिसाचा २०० किमी प्रवास; संपवून शेजारी बसला; बसमध्ये खळबळ
मंचावर हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये काही दिवसांपूर्वीच १२ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. इतक्या कमी वयात हृदयविकाराच्या झटक्यानं झालेला हा पहिलाच मृत्यू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. १२ वर्षांचा मनिष जाटव इयत्ता चौथीत शिकत होता. मनिष त्याचा भाऊ इटावा येथील शाळेत गेला होता. शाळेत मधल्या सुट्टीत तो जेवला. घरी परतण्यासाठी दुपारी २ वाजता मनिष बसमध्ये चढला. बसमध्ये त्याला भोवळ आली. मनिषला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांना त्याला वाचवण्यात अपयश आलं.
आम्हाला करोना होईल! तब्बल ३ वर्षे मायलेकींनी घरात कोंडून घेतलं; पोलिसांनी दार तोडलं अन्…
तत्पूर्वी सिवनीतील एका लग्न सोहळ्याआधी संगीत कार्यक्रमात एका महिलेचा मृत्यू झाला. संगीत सोहळ्यात नाचताना महिला अचानक खाली कोसळली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्याआधी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका अल्पवयीन मुलाचा शिंकताना मृत्यू झाला. शिंकताना मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Get India news, latest marathi news headlines from all states of India. Stay updated with us to get latest India news in marathi.

1 COMMENT

  1. Good day I am so thrilled I found your website, I really found you by error, while I was researching on Bingfor something else, Regardless I am here now and would just like to say many thanks for a fantastic post and a all round enjoyable blog (I also love the theme/design), I don’t have time to read it all at the moment but I have saved it and also added in your RSS feeds, so when I havetime I will be back to read more, Please do keep up the awesome jo.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here