मुंबई: मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षनेते यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे.

वाचा:

देवेंद्र फडणवीस हे आज ५० वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सहा महिन्यांपूर्वी फडणवीस यांच्यापासून राजकीयदृष्ट्या दुरावलेल्या उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उद्धव यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या परंपरेला साजेसे काम आपल्याकडून घडो, याच सदिच्छा,” असं पाटील यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री , भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनीही फडणवीसांचं अभिष्टचिंतन केलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही अशाच उत्साहाने आणि समर्पित भावनेने महाराष्ट्र राज्यातील लोकांची सेवा करत राहावी. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असं शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर, फडणवीस यांच्यामुळं महाराष्ट्रात भाजपला बळकटी मिळाली अशा शब्दांत कौतुक करत नड्डा यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. करोनाच्या संकटामुळं सर्वच नेत्यांनी यंदा वाढदिवस साजरा करण्याचं टाळलं आहे. त्यामुळं पक्षपातळीवर कुठलाही मोठा कार्यक्रम गेल्या काही दिवसांत झालेला नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनच कार्यकर्ते, चाहते व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या जात आहेत. तसं आवाहन अजित पवार व फडणवीसांनी आधीच केलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here