नवी दिल्ली: २०२२ वर्षाचा शेवट जवळ आला आहे. नवीन वर्ष आता अवघ्या ७ दिवस दूर आहे. संपूर्ण वर्षावर नजर टाकली तर, यावर्षी देशात अनेक कॉर्पोरेट सौदे झाले, जे येत्या काही वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र बदलू शकतात. यामध्ये विमान वाहतूक क्षेत्रापासून कोर क्षेत्र, मीडिया ते रिटेल क्षेत्र, नवीन उदयोन्मुख स्टार्टअप क्षेत्रापर्यंतच्या करारांचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत देशाचे नशीब बदलू शकणार्‍या काही प्रमुख निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत.

देशातील सर्वात जुन्या व्‍यवसाय घराण्‍यापैकी एक, टाटा समुहापासून ते दुसऱ्या पिढीतील उद्योगपती मुकेश अंबानी आणि पहिल्या पिढीतील गौतम अदानी या अब्जाधीशांनी सरत्या वर्षी अनेक महत्त्वाचे निर्णय घेते. एवढेच नाही तर या सौद्यांमुळे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीतही मोठी झेप घेतली आहे.

भारीच! ना अदानी, ना LIC… हे IPO ठरले २०२२ चे स्टार परफॉर्मर, कंपन्यांनी केली बंपर कमाई
एअर इंडियाची घसरवापसी
टाटा समूहात एअर इंडियाच्या पुनरागमनाने वर्ष २०२२ ची सुरुवात झाली. २०२१ च्या अखेरीस एअर इंडिया खरेदीचा करार पूर्ण झाला असला तरी, टाटा समूहासोबत एअर इंडियाच्या विलीनीकरणाला जानेवारीमध्ये शिक्कामोर्तब झाला. २६ जानेवारीच्या सुमारास एअर इंडिया अधिकृतपणे टाटा समूहाचा एक भाग बनली. टाटा समूहाने १९३२ मध्ये एअर इंडियाची स्थापना केली होती, तर एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीतून सरकारला संपूर्ण १८,००० कोटी रुपये मिळाले.

दरम्यान, आता लवकरच एअर इंडिया विमान वाहतूक क्षेत्रातील एक मोठा जागतिक ब्रँड बनण्याच्या मार्गावर आहे. यामागचे कारण म्हणजे टाटा समूह आपली दुसरी विमानसेवा एअर विस्ताराचे विलीन करण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी एअरएशिया इंडियाचेही एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे, जी स्वस्त विमानसेवा पुरवते.

Year Ender 2022 : वर्षभरात भारतात लाँच झाल्या या ५ शानदार कार्स, फीचर्स पाहून प्रेमात पडाल

पीव्हीआर-आयनॉक्स डील
या वर्षातील मीडिया विभागातील मोठ्या कराराबद्दल बोलायचे तर, मल्टीप्लेक्स कंपनी, पीव्हीआरने आयनॉक्सचे अधिग्रहणाचा करार केला. हा करार मार्चमध्ये जाहीर करण्यात आला आणि त्याची नियामक औपचारिकता चालू आर्थिक वर्षातच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या करारासह PVR ही देशातील सर्वात मोठी सिनेमा स्क्रीन ऑपरेटर कंपनी आणली. कंपनीची एकूण १०९ शहरांमध्ये ३४१ चित्रपटगृहे असतील, ज्यामध्ये १५४६ स्क्रीनवर चित्रपटाचे प्रदर्शित केले जातील. एवढेच नाही तर येत्या ५ वर्षांत या स्क्रीन्सची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.

रिलायन्स स्मार्ट बाजार
रिलायन्सने स्मार्ट बाजार उघडणे कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरण आणि अधिग्रहण कराराचा भाग नाही. पण ते त्याहून वेगळे नाही. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने फ्युचर ग्रुपचा रिटेल व्यवसाय २४,७१३ कोटी रुपयांत खरेदी केला. पण ॲमेझॉनने त्याला पूर्णविराम दिला. फ्युचर ग्रुप आणि ॲमेझॉन यांच्यात एक दीर्घ कायदेशीर लढाई देखील चालली होती, मात्र, त्याचा परिणाम अजूनही समोर आला नाही.

Wedding Makeup: २०२२ मधले ५ ट्रेंडी मेकअप, नवरी दिसेल अधिक आकर्षक

अंबानींनी एक नवीन मार्ग शोधला आणि रिलायन्स ग्रुपने फेब्रुवारीच्या अखेरीस फ्युचर ग्रुपच्या रिटेल स्टोअर्सचे कामकाज ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यात बिग बाजारसारख्या मोठ्या ब्रँडच्या दुकानांचाही समावेश होता. रिलायन्सने फ्युचर ग्रुपला, ज्या ठिकाणी ही दुकाने उघडली होती, त्या ठिकाणांची लीज कागदपत्रे गहाण ठेवून कर्ज दिले. नंतर लोकांचा रोजगार वाचवण्यासाठी त्याच ठिकाणी स्मार्ट बाजार सुरू झाले. या संपूर्ण प्रक्रियेमुळे रिलायन्स भारतातील सर्वात मोठी रिटेल कंपनी बनली.

अदानी बनले सिमेंटचा ‘किंग’
या वर्षातील तिसरी मोठी डील, सिमेंट क्षेत्रातील राहिली. भारतासह आशियातील अतिश्रीमंत गौतम अदानी यांना पूर्वी देशाचा ‘पोर्ट किंग’ म्हटले जायचे, पण आता ते ‘सिमेंट किंग’ही बनले आहेत. मे महिन्यात अदानी समूहाने एसीसी आणि अंबुजा सिमेंट या दोन मोठ्या सिमेंट कंपन्यांचे अधिग्रहण केले.

या दोन्ही सिमेंट कंपन्यांमध्ये स्वित्झर्लंडच्या होल्सीम लिमिटेडची हिस्सेदारी होती, जी अदानी समूहाने सुमारे ८१,३५० कोटी रुपयांत खरेदी केली. यासह अदानी समूह, देशातील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनली तर अल्ट्राटेक सिमेंट पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

झोमॅटोने ब्लिंकिट मिळवले
फूड डिलिव्हरी स्टार्टअपने जूनमध्ये ऑनलाइन किराणा कंपनी ब्लिंकिटचे अधिग्रहण केले, ज्यावर शेअर बाजरात सूचीबद्ध झाल्यानंतर चांगल्या परताव्याची टीका करण्यात आली. ब्लिंकिट, पूर्वी ग्रोफर म्हणून ओळखले जायचे. झोमॅटोने ४,४४७ कोटी रुपयांचा करार केला. या करारामुळे झोमॅटोने किराणा किरकोळ क्षेत्रात प्रवेश केला, तर बिगबास्केटने झेप्टो आणि ॲमेझॉन फ्रेश सारख्या सेवांना थेट टक्कर दिली. कोविड दरम्यान, किराणा किरकोळ विभाग, मंदीचा परिणाम न झालेल्या मोजक्या बाजारांपैकी एक होता. टाटा समूहाने २०२१ मध्येच बिगबास्केट खरेदी केले होते.

1 COMMENT

  1. Thanks so much for your insights on Noom. I, too, have heard the ads and wondered if they were somehow very different than other programs. Great information. I look forward to reading the article. Thanks again! Love your podcast!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here