ढाका: भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा दुसरा डाव सुरू असताना भारताचा माजी कर्णधार विराट कोहली संतापलेला दिसला. मीरपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपत असताना बांगलादेशचा फलंदाज वेळकाढूपणा करत होता. त्यामुळे कोहली संतापला.

दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात बांगलादेशची फलंदाजी सुरू होती. त्यावेळी सूर्यप्रकाश कमी झाला होता. दिवसातील कमी षटकांचा खेळ शिल्लक होता. अशा परिस्थितीत वेळकाढूपणा करण्यासाठी बांगलादेशचे फलंदाज विविध मार्गांचा वापर करत होते. सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर नजमुल हुसैन शांतो बुटांच्या लेस बांधण्यास सुरुवात केली.
धोनीच्या संघात अपमानास्पद वागणूक, तडकाफडकी CSK सोडली; लिटिलसाठी यंदा तब्बल ४.४० कोटींची बोली
शांतो वेळ वाया घालवण्यासाठी मुद्दाम बुटाची लेस बांधत असल्याचं विराट कोहलीच्या लक्षात आलं. त्यावरून कोहलीनं शांतूची खिल्ली उडवली. कोहलीनं स्वत:ची जर्सी काढत असल्याचा अभियन केला. आता शर्टदेखील काढ, असं कोहली शांतूला म्हणाला. कोहलीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नजमुल हुसेन शांतोनं फलंदाजी दरम्यान वेळ वाया घालवण्यासाठी अनेक मार्ग वापरले. संघाचा दुसरा डाव सुरू होताच शांतो फलंदाजीला आला. काही वेळातच त्यानं डग आऊटच्या दिशेनं हातवारे केले. यानंतर संघ सहकारी दुसरी बॅट घेऊन मैदानात आला. मात्र शांतोनं ती बॅट घेतलीच नाही. त्यानं आधीच्याच बॅटनं फलंदाजी सुरू ठेवली आणि बाराव्या खेळाडूला पुन्हा डगआऊटकडे पाठवलं.

दुसऱ्या कसोटीत भारतानं बांगलादेशचा पहिला डाव २२७ धावांत गुंडाळला. मोमिनुल हकनं सर्वाधिक ८४ धावा केल्या. भारताकडून उमेश यादव आणि आर. अश्विननं प्रत्येकी चार फलंदाजांना बाद केलं. भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. १०० धावा पूर्ण होण्याआधीच चार फलंदाज माघारी परतले. मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरनं शतकी भागिदारी केली. त्यामुळे भारतानं पहिल्या डाव्यात ३१४ धावा केल्या. पंतनं ९३ आणि अय्यरनं ८७ धावा केल्या. त्यांच्या फलंदाजीमुळे भारताला ८७ धावांची आघाडी मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here