चंद्रपूर : आज चंद्रपुरात जिल्हा क्रीडा संकुलातील बांधकामाचे लोकार्पण आणि नव्या कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात वादंग झाले. नियोजित वेळी पालकमंत्री कार्यक्रमस्थळी आलेच नाहीत. त्यामुळे तीन तासांपासून वाट बघून वैतालेले खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतःच वॉकिंग ट्रॅकचे भूमिपजन केले आणि निघून गेले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी तणाव निर्माण झाला. भाजप पदाधिकाऱ्यांचे चेहरे पडले. त्यानंतर एका तासाने पालमकंत्री सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमस्थळी पोहचले आणि त्यांनी क्रीडा संकुलातील झालेल्या कामांचे लोकापर्ण केले.

जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटीक ट्रॅंक, फुटबाल ग्राऊंड आणि चेंजिंगरुमचे लोकापर्ण आणि वाकींग ट्रॅकचे भूमिपूजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज सायंकाळी ४.३० वाजता आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरूनच वादंग निर्माण झाला. भाजपने स्वतः कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापल्या. यात प्रमुख अतिथी, विशेष अतिथी म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे होती. शासकीय पत्रिकेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना स्थान देण्यात आले.

संजय राऊत यांचे ‘ते’ खंदे समर्थक थेट शिंदे गटाच्या सचिवपदी, उद्धव ठाकरेंनी केली होती हकालपट्टी
मात्र, भाजपला पत्रिका छापण्याचा अधिकार दिला कुणी, असा सवाल आमदार किशोर जोरगेवार यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कोनशिलेवरचे नाव काढण्याची विनंती केली. आमदार जोरगेवार यांना कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. दुसरीकडे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अगदी वेळेवर पोहचले. कार्यक्रमाला एक तास उशीर होईल, असे गृहीत धरुन ते आपल्या जिल्हा क्रीडा संकुलाजवळील जनसंपर्क कार्यालयात बसून होते. मात्र तीन तासानंतर कार्यक्रमस्थळी पालकमंत्री पोहचले नाहीत.

तर, दुसरीकडे धानोरकर दांपत्याचे नियोजित कार्यक्रमाचे वेळापत्रक कोलमडले. भाजप व्यतिरिक्त कोणत्याही लोकप्रतिनिधीने कार्यक्रमाला येवू नये, यासाठी जाणीवपूर्वक विलंब करीत आहे. नेहमी असेच केले जाते. असा आरोप करत वैतागून धानोरकर दांम्पत्य कार्यक्रमस्थळी पोहचले आणि त्यांनी वॉकिंग ट्रकचे भूमिपूजन केले. तत्पूर्वी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. कॉंग्रेसच्या खासदार आणि आमदारांना पालकमंत्री पोहचण्यापूर्वीच भूमिपूजन केल्याने भाजप कार्यकर्त्यांचे चेहरे चांगलेच पडले. त्यानंतर दोघांनीही कार्यक्रमस्थळ सोडले. एका तासाने पालकमंत्री मुनगंटीवार कार्यक्रमस्थळी पोहचले. त्यांनी क्रिडा संकुलात झालेल्या कामांचे लोकापर्ण केले. भूमिपूजन करण्याचे त्यांनी टाळले.

मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, भाजप खासदाराची मोदींवर टीका; वाचा, टॉप १० न्यूज
सत्ता येते आणि जाते. ती कुणाच्या बापाची नाही. पालकमंत्री येतात जातात. हा शासनाचा निधी आहे. भाजप पत्रिका छापतात. तो भाजपचा कार्यक्रम नाही. याचे भान ठेवायला हवे. कार्यक्रमाला अर्धा- एक तास उशीर समजून शकतो. तीन-चार तासापर्यंत लोकप्रतिनिधींना ताटकळत ठेवले जाते. प्रोटोकॉल प्रमाणे कार्यक्रम घ्यायला हवा. आमचा अपमानच करणार असाल तर मग बोलविता कशाला, असेही ते पुढे म्हणाले.

नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार खासदारांना आहे. व्यस्ततेमुळे मला उशिर झाला. खासदार सुद्धा अनेक कार्यक्रमात उशीरा जातात. नागपुरात काही माध्यमांचे कार्यक्रम होते. त्यामुळे उशीर झाला, असे स्पष्टीकरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

हे तर अतीच झालं…; पंचमुखी मारोतीचे दुसऱ्यांदा डोळे चोरले, गावात भितीचे वातावरण
निषेधाचा फलक, नायडू ताब्यात

छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या समस्याकंडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेश नायडू यांनी कार्यक्रस्थळी धरणे दिले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पोहचात हातात फलक घेवून नायडू मधोमध बसले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. नायडू स्वतः छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आहेत. मात्र, या कार्यक्रमाची साधी निमंत्रण पत्रिकासुद्धा त्यांना देण्यात आली नव्हती. याचा निषेध म्हणून त्यांनी सभास्थळ गाठळे. शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि कार्यक्रमस्थळाबाहेर काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here