उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एका तरुणाला निर्वस्त्र करून मारहाण केल्याचं दिसत आहे. तिथे उपस्थित असलेली एक महिला तरुणाला बांधण्यासाठी दोरी मागत आहे. हा प्रकार शहरातील एका खासगी रुग्णालयात घडल्याचं सांगितलं जात आहे. तरुणानं रुग्णालयाचं बिल भरलं नाही. त्यावरून वाद झाला.

दीड लाख रुपयांचं बिल पाहून राम अवतारचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला ७५ हजार रुपयांची सवलत देण्याची मागणी केली. मात्र रुग्णालय प्रशासनानं सूट देण्यास असमर्थतता दर्शवली. यानंतर रुग्णालयाच्या रुग्णाच्या नातेवाईकाला (तरुणाला) मारहाण केली. त्याचे कपडे काढले आणि दांड्यानं, बेल्टनं मारहाण सुरू केली.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री बृजेश पाठक यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना व्हिडीओचा तपास करण्याचे आदेश दिले. तपासासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. रुग्णालयाचं व्यवस्थापन पाहणाऱ्या रियाझ नावाच्या व्यक्तीला तपासात सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.