गुरुग्राम: हरयाणाच्या गुरुग्राममध्ये एका नेत्याच्या सुनेनं पतीविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पतीनं अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याचा, मारहाण केल्याचा आरोप तिनं केला आहे. सासरकडच्यांनी हुंडा मागितल्याचा दावादेखील तिनं केला. गुरुग्राममधील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या सेक्टर १५ मध्ये हा प्रकार घडला. पती अभिनव वशिष्ठनं मधुचंद्राच्या रात्री जबरदस्तीनं अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. विरोध करताच मारहाण केली, अशी तक्रार महिलेनं नोंदवली आहे.

पतीनं केलेल्या कृत्याची तक्रार महिलेनं सासूकडे केली. मात्र सासू मुलाचीच बाजू घेऊ लागली. माझा मुलगा कॅनडातून आला आहे आणि तिकडे ही बाब अतिशय सामान्य आहे, असं सासू म्हणाली. यानंतर पती पीडितेला हनीमूनला मालदिव्सला घेऊन गेला. तिथेही त्यानं पीडितेसोबत हाच प्रकार केला. पती वारंवार तेच करत होता. त्यानं महिलेला नशेच्या गोळ्या दिल्या. तिच्यासोबत दुष्कृत्य केलं.
मी पत्नीला संपवलंय, मला अटक करा! शिक्षक पोलीस ठाण्यात; पोलिसांनी घरी जाऊन पाहिलं तर…
लग्नानंतर काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे भीती वाटत असल्याचं पीडितेनं पोलिसांना सांगितलं. ‘मी याबद्दल कोणाकडेच काही बोलले नाही. मला कोणालाही ही गोष्ट सांगता येत नव्हती. पती आणि सासू-सासरे हुंड्याची मागणी करतात. पाणी डोक्यावरून जाऊ लागल्यानंतर अखेर मी तिघांविरोधात पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला’, असं पीडिता म्हणाली.
दुर्मीळ! तरुणाला सतत पोटदुखी; हर्नियाचं ऑपरेशन सुरू असताना डॉक्टरांना दिसलं गर्भाशय अन्…
पीडितेनं पती अभिनव, सासू आणि सासरे यांच्याविरोधात सिविल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तिन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here