मुंबई: मुंबईतील वांद्रे परिसरात एका इमारतीवरील छतावर बर्थडे साजरा करण्यात आला. यावेळी उत्साहाच्या भरात ‘बर्थडे बॉय’नं तलवारीनं केक कापला. बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्यांनी मास्कही घातला नव्हता. तसंच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडाला होता. या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी टिकटॉक स्टारसह ३० जणांवर कारवाई केली. त्यातील काही जणांना सोमवार आणि मंगळवारी अटक केली.

वांद्रे पोलिसांनी टेरेसवर पार्टी करणाऱ्या ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी हरिश खान याला पोलिसांनी शनिवारी रात्रीच अटक केली होती. तर या पार्टीत सहभागी होऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ३० पैकी काही जणांना सोमवारी आणि मंगळवारी केलेल्या कारवाईत अटक केली. टिकटॉक स्टार असलेल्या आमिर शेखचंही आरोपींमध्ये नाव आहे. आमिरविरोधात वांद्रे पोलिसांनी कलम १८८ आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जण शनिवारी रात्री हरिशच्या इमारतीच्या छतावर करत होते. त्याच दरम्यान कुणीही मास्क लावला नव्हता. तसंच सोशल डिस्टन्सिंगही पाळलं नव्हतं. हरिश खान याचा बर्थडे होता. त्याने केक कापण्यासाठी तलवारीचा वापर केला. तलवारीनं केक कापणं किंवा तलवारीचा वापर करणं बेकायदेशीर आहे. त्यामुळं पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. बर्थडेचा व्हिडिओ शनिवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी पोलिसांनी हरिश खानविरोधात दाखल तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलीस करत असून, आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here