आयपीएलमधील गतविजेता संघ गुजरात टायटन्ससोबत कंपनीनं मोठा करार केला आहे. बाटलीबंद पाण्याच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली बिस्लेरी गुजरात टायटन्सच्या संघाची हायड्रेशन पार्टनर असेल. बिस्लेरीनं संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं हा करार ३ वर्षांसाठी केला आहे.

 

jayanti
मुंबई: बिस्लेरी विकली जाणार असल्याच्या बातम्या येत असताना कंपनीनं एक मोठा करार केला आहे. एकुलती एक मुलगी जयंतीला व्यवसायात रस नसल्याचं तिचे वडील आणि बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांनी सांगितलं. व्यवसाय सांभाळण्यासाठी उत्तराधिकारी नसल्यानं कंपनी विकत असल्याचं चौहान म्हणाले. त्यामुळे जयंती चौहान चर्चेत आल्या. आता पुन्हा जयंती यांचं नाव चर्चेत आहे. आयपीएलमध्ये बिस्लेरीनं एक मोठा करार केला आहे.

आयपीएलमधील गतविजेता संघ गुजरात टायटन्ससोबत कंपनीनं मोठा करार केला आहे. बाटलीबंद पाण्याच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली बिस्लेरी गुजरात टायटन्सच्या संघाची हायड्रेशन पार्टनर असेल. बिस्लेरीनं संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं हा करार ३ वर्षांसाठी केला आहे. आयपीएल २०२३ पासून या कराराला सुरुवात होईल.
वडिलांची एकुलती एक मुलगी; तरीही सोडतेय ७ हजार कोटींची बिस्लेरी; कोण आहेत जयंती चौहान?
बिस्लेरीच्या उपसंचालक जयंती चौहान यांनी करारानंतर लिंक्डइनवर एक पोस्ट केली. त्यांनी कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. गुजरात टायटन्ससोबत बिस्लेरीनं केलेली भागिदारी आपल्या ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. फिटनेस मिशनच्या अंतर्गत हे महत्त्वाचं पाऊल आहे. आपण ही वाटचाल पुढे अशीच सुरू ठेवू. क्रिकेटसोबतच अन्य क्रीडा प्रकारांमध्ये वाटचाल करण्याचा प्रयत्न करू. अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल, असं जयंती यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
सात हजार कोटींच्या बिस्लेरीवर पाणी का सोडलं? जयंती चौहानांनी एका वाक्यात बरंच काही सांगितलं
पुढील तीन सीझन बिस्लेरी गुजरात टायटन्सची हायड्रेशन पार्टनर असेल, अशी माहिती टायटन्सचे सीओओ अरविंद सिंह यांनी दिली. या करारामुळे आम्ही आनंदित आहोत. गुजरात टायटन्स आणि बिस्लेरी यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तम काम केलं आहे. तेच काम सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे. या करारामुळे दोन्ही कंपन्या मजबूत होतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. गुजरात टायटन्सचा संघ २०२२ मध्ये आयपीएलचा भाग झाला. पहिल्याच स्पर्धेत या संघानं जेतेपदाला गवसणी घातली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाच्या जोरावर संघानं पहिल्याच स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here