मुंबई- हा एक असा दिग्दर्शक आहे जो निर्भिडपणे आपली मतं मांडतो. सोशल मीडियावर तो आपले विचार अनेकदा व्यक्त करतो. नुकतंच एका ट्रोलरने अनुरागच्या अपयशी लग्नावर कमेन्ट केली. त्या ट्रोलरने अनुरागने त्याच्याच भाषेत सडेतोड उत्तर दिलं आहे.

अनुरागने ट्रोलला दिली शिकवण

अनुराग कश्यपच्या ट्वीटवर एका ट्रोलरने निंदनीय कमेन्ट केली होती. पण त्याला त्याच्याच भाषेत अनुरागने उत्तर दिलं. ट्रोलरने लिहिले की, ज्याला स्वतःची बायको सांभाळता आली नाही तो ज्ञान देत आहे. या ट्वीटला उत्तर देत अनुरागने लिहिले की, ‘महिलांना सांभाळावं लागत नाही त्या स्वतःला सांभाळू शकतात. एवढंच नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबालाही त्या सांभाळू शकतात. जमलं नाही तर निघून गेली. गुलाम नव्हती की तिला बांधून ठेवेन.. बाकी तुझी प्रकृती उत्तम आहे ना?’

कंगनावरच्या कमेन्टनंतर अनुरागला करण्यात आलं ट्रोल
कंगनाविरुद्ध जेव्हा अनुरागने ट्वीट केलं होतं तेव्हापासून त्याला ट्रोल केलं जात आहे. ट्वीटमध्ये अनुराग म्हणाला की, त्याची आणि कंगनाची चांगली मैत्री होती. पण आताच्या नव्या कंगनाला तो ओळखत नाही. अनुरागच्या या कमेन्टवर कंगनाच्या टीमने त्याला ‘मिनी महेश भट्ट’ म्हटलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here