मुंबई: या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यातही प्राथमिक बाजारात चांगलीच गजबज असणार आहे. नवीन आठवड्यात जिथे दोन कंपन्या त्यांची प्राथमिक सार्वजनिक विक्री ऑफर (आयपीओ) लाँच करतील. तर दोन कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात सूचिबद्ध (लिस्टिंग) होतील. पहिला आयपीओ रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा आहे. हा आयपीओ शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी लॉंच झाला होता तर पुढील आठवड्यात २७ डिसेंबरपर्यंत खुला असेल. रिटेल कॅश मॅनेजमेंट सेवा पुरवणाऱ्या या कंपनीने आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर ९४ ते ९९ रुपये किंमतपट्टा ठेवला आहे. कंपनी सर्वाधिक किंमत पट्ट्यावर एकूण ३८८ कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.

ड्रोनाचार्यची शेअर बाजारात डिस्काउंटसह लिस्टिंग, एका झटक्यात गुंतवणूकदार मालामाल; मिळाला ‘हा’ दर

साह पॉलिमर्सचा आयपीओ
दुसरा आयपीओ साह पॉलिमर्सचा असेल, जो ३० डिसेंबरला खुला होईल आणि ४ जानेवारीला बंद होईल. या वर्षी गुंतवणुकीसाठी खुला होणारा हा शेवटचा आयपीओ असणार आहे. बल्क पॅकेजिंग सेवा प्रदान करणारी ही कंपनी २६ डिसेंबर रोजी आपल्या आयपीओचा किंमत पट्टा जाहीर करेल. साह पॉलिमर्सचा आयपीओ पूर्णपणे नवीन शेअर्सचा आहे. कंपनीने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ७५ टक्के, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) १५ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उर्वरित १० टक्के राखीव ठेवले आहेत.

कंपनी आयपीओ मधून मिळणारी रक्कम फ्लेक्सिबल इंटरमीडिएट बल्क कंटेनर्स (FIBC) साठी उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी, इतर खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतर सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरेल.

भारीच! ना अदानी, ना LIC… हे IPO ठरले २०२२ चे स्टार परफॉर्मर, कंपन्यांनी केली बंपर कमाई

केफिन टेकच्या शेअर्सची २९ डिसेंबर रोजी लिस्टींग
केफिन टेक कंपनीचे शेअर्स २९ डिसेंबर रोजी बाजारात लिस्ट होतील. कंपनीचा १,५०० कोटींचा आयपीओ २१ डिसेंबर रोजी २.५९ पट सबस्क्रिप्शनसह बंद झाला. तर, कंपनी २६ डिसेंबर रोजी कंपनी आपल्या शेअर्सचे वाटप करणार असून २७ डिसेंबरपर्यंत अयशस्वी गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे परत केले जातील. त्याच वेळी, २८ डिसेंबरपर्यंत यशस्वी गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील.

एलिन इलेक्ट्रॉनिक्सची लिस्टींग
इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर एलिन इलेक्ट्रॉनिक्सची देखील पुढील आठवड्यात ३० डिसेंबर रोजी लिस्टींग अपेक्षित आहे. हा ४७५ कोटी रुपयांचा आयपीओ २२ डिसेंबर रोजी ३.०९ पट सबस्क्रिप्शनसह बंद झाला. एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सचे वाटप २७ डिसेंबर रोजी होणार आहे. कंपनी २८ डिसेंबरपासून अयशस्वी गुंतवणूकदारांना परतावा देण्यास सुरुवात करेल. तसेच २९ डिसेंबरपर्यंत यशस्वी गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील.

IPO लिस्टिंगच्या दिवशी नुकसान आता शेअरने पकडला ‘बुलेट’चा वेग; शेअर्सचा भाव ६ महिन्यांच्या उच्चांकावर
यंदा आयपीओमधून ६० हजार कोटी उभारले
वर्ष २०२२ आयपीओ बाजारासाठी खूप चांगले ठरले. या वर्षी सुमारे ४० आयपीओने मोठी अस्थिरता असूनही बाजारातून ६०,००० कोटी रुपयांहून अधिक यशस्वीरित्या उभारले आहेत. २०२१ च्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी २०२१ मध्ये एकूण ६५ आयपीओ आले आणि त्यांनी १.३१ लाख कोटी रुपये उभे केले. एका वर्षात आयपीओमधून उभारलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.

पुढील वर्षी ५० कंपन्यांचे आयपीओ येण्याची शक्यता
२०२३ मध्ये देखील आयपीओ बाजार व्यस्त असणार आहे. सेबीला आयपीओ लॉन्च करण्यासाठी सुमारे ५० कंपन्यांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. या कंपन्यांमध्ये यात्रा ऑनलाइन, फॅब इंडिया, वेलनेस फॉरएव्हर, सिग्नेचर ग्लोबल, बालाजी स्पेशालिटी केमिकल्स, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, पिझ्झा वायर्स, ड्रूम टेक्नॉलॉजीज, नवी टेक्नॉलॉजीज, पीकेएच व्हेंचर्स, भारत ईआयएच, मॅकलिओड्स फार्मा, आधार हाउसिंग फायनान्स, टीव्हीएस सप्लाय चेन सोल्यूशन्स यांचा समावेश आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here