मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसाठी हे वर्ष अतिशय खास ठरलं. यावर्षी दोघं विवाहबंधनात अडकले. तर काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका मुलीला जन्म दिला. दुसरीकडे याचवर्षी त्यांचा एकत्र पहिला सिनेमा ब्रह्मास्त्रही प्रदर्शित झाला. वर्षाअखेरीस त्यांनी क्रिसमसचं सेलिब्रेशनही मोठ्या उत्साहात केलं. भट्ट आणि कपूर कुटुंबीयांनी मिळून एकत्र क्रिसमस सेलिब्रेशन केलं. आलियाने सोशल मीडियावर या पार्टीचे काही इनसाइट फोटो शेअर केले आहेत.आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर क्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रणबीर-आलियाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो आहे. या दोघांच्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

हेही वाचा – कौशलांच्या घरी कुणीतरी येणार गं? कतरिना कैफच्या या फोटोमुळं मिळतेय चर्चेला हवा

alia-bhatt

हेही वाचा – तुनिषा शर्माआधी या कलाकारांनीही मृत्यूला कवटाळलं, लहान वयातच संपवलं आयुष्य

आलियाने फोटो शेअर करत, जगातील सर्वात चांगल्या लोकांसोबत, हा वर्षातील सर्वात चांगला काळ आहे असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

भट्ट आणि कपूर कुटुंबीयांनी एकत्र क्रिसमस सेलिब्रेट केला. आलियाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात नितू कपूर, सोनी राजदान, शाहीन भट्ट, पूजा भट्ट अशी गर्ल गँग एकत्र पोज देताना दिसते आहे.

हेही वाचा – The Archies: लेडिज पर्स घेऊन पोज देणारा सुहाना खान-खुशी कपूरसोबतचा हा मुलगा आहे तरी कोण?

आलिया आणि तिची बहीण शाहिन भट्ट दोघी एकमेकींच्या अतिशय जवळ आहेत. कोणत्याही कार्यक्रमावेळी त्या दोघी एकत्र दिसतात. आता क्रिसमस दोघींनी एकत्र साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here