Authored by सचिन जाधव | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Dec 2022, 11:57 am
Satara News : चॉकलेट खाताना १ वर्षाच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्यामुळे त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना साताऱ्यात घडली. शर्वरी जाधव असे या चिमुकलीचे नाव असून ती घराबाहेर खेळत असताना तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलीने तीला ते चॉकलेट खायला दिले होते.

हायलाइट्स:
- चॉकलेट घशात अडकल्याने १ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
- साताऱ्यातील कोडोली येथील धक्कादायक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, शर्वरीला तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका मुलीने जेली चॉकलेट खाण्यास दिली. हे चॉकलेट तिने चावून न खाता गिळले. यामुळे ते चॉकलेट तिच्या घशात जाऊन अडकले. यामुळे ते खोकू लागली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही वेळातच ती बेशुद्ध पडली. ही घटना तिच्या आईला कळताच तिने तातडीने घराशेजारी राहणाऱ्यांना बोलावून घेत तिला जिल्हाशासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासले असता त्यांनी तिला मृत घोषित केले. आपली एक वर्षाच्या मुलीचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने कुटुंबाने एकच टाहो फोडला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.