मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ उदय सामंत यांचा पाय खोलात जाण्याची दाट शक्यता आहे. टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनीला राज्य सरकारने बेकायदा सबसिडी दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

samant

हायलाइट्स:

  • शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत अडचणीत
  • २१० कोटींचं बेकायदा अनुदान दिल्याचा संशय
  • अधिवेशनात विरोधक लक्ष्य करण्याची शक्यता
रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ उदय सामंत यांचा पाय खोलात जाण्याची दाट शक्यता आहे. टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनीला राज्य सरकारने बेकायदा सबसिडी दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत अडचणीत येण्याची शक्यता आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे गटानं सामंत यांना लक्ष्य केलं आहे.

टिळक नगर इंडस्ट्रीजला २१० कोटी रुपयांची सबसिडी दिल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या कंपनीचा एक प्रकल्प दाखवून हे अनुदान देण्यात आल्याचा संशय आहे. एक प्रकल्प अहमदनगर, तर दुसरा प्रकल्प ३५० किलोमीटर लांब असलेल्या रत्नागिरी येथे आहे. मात्र दोन्ही कंपन्या मिळून एक कंपनी दाखवून या कंपनीला २१० कोटी रुपयांचे अनुदान दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केवळ १०० दिवसांत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. सबसिडीबद्दलचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही बजेट एकत्र दाखवून २१० कोटींचं अनुदान दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत कोणती भूमिका मांडतात, त्यांची बाजू कशा पद्धतीने मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here