Authored by अमोल सराफ | Edited by कुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Dec 2022, 3:27 pm

Crime News: जिल्ह्यासह परिसरात विशेषत: सरकारी कार्यालयं आणि गर्दीच्या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा या चोरीचा छडा लावण्याकरता कामाला लागली होती. यामध्ये पोलिसांना मोठं यश आलं आहे. जिल्ह्यातील शेगाव परिसरातील एका विहिरीतून दुचाकी निघायला सुरुवात झाली आहे

 

buldhana well
बुलढाणा: जिल्ह्यासह परिसरात विशेषत: सरकारी कार्यालयं आणि गर्दीच्या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा या चोरीचा छडा लावण्याकरता कामाला लागली होती. यामध्ये पोलिसांना मोठं यश आलं आहे. जिल्ह्यातील शेगाव परिसरातील एका विहिरीतून दुचाकी निघायला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे विहिरीत फेकत होते. शेगाव रस्त्यावर विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणं सुरू केलं आहे. मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलं आहे. दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात बुलडाणा पोलिसांना यश आलं आहे.
दोनदा बेपत्ता, दोन्हीवेळा पोलिसांनी शोधले; स्मृतीभ्रंश झालेल्या आजोबांसोबत नको ते घडले
पोलिसांनी शेगाव येथील ईदगाह प्लॉट परिसरात राहणाऱ्या सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम (वय ३८ वर्षे) याला ताब्यात घेऊन दुचाकी चोरीबाबत चौकशी केली होती. यावेळी सैय्यद वसिम याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी हिसका दाखवला असता सैय्यद वसिम पोपटाप्रमाणे बोलू लागला व गुन्ह्यांची कबुली दिली. काही दुचाक्यांची मोडतोड केली असल्याचीही माहिती दिली. त्याच्यासोबत आणखी काही जण या टोळीत असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही टोळी दुचाकीचे वेगवेगळे पार्ट करून नंतर दुचाकी विहिरीत टाकत होती. चौकशीत ही माहिती उघड झाली.
बदले की ‘आग’, पडली महागात! दुश्मनी एकाशी, पण तब्बल २० जणांच्या कार पेटल्या; अफेअर ठरलं कारण
चोरट्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शेगाव ते वरवट बकाल रस्त्यावर एका शेतातील विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्यासह खामगाव आणि शेगाव येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेलं असून आणखी एका विहिरीतही अशा दुचाकी असल्याची माहिती आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here