नाशिक : नाशिकच्या वणी गडावर भाविकांच्या पिकअप या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वाहनातील ३०हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अपघातात जखमी असलेले सगळे भाविक मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील असल्याची माहिती मिळाली आहे. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअपने पलटी घेतली आणि हा अपघात झाला आहे. सर्व भाविक या मालवाहतुक करणाऱ्या गाडीने सप्तशृंगी गड येथे दर्शनाला चालले होते. सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटले आणि हा अपघात झाला.

मालेगाव दाभाडी येथील बंडु गांगुर्डे यांच्या पिकअप क्रमांक एमएच १८ बी.झेड. ८१६७ या क्रमांकाच्या पिकअपमधून सदर भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. सदर वाहनातील भाविकांनी आक्रोश केल्यानंतर गडावरील नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना घटनास्थळावरून उपचारासाठी हलवलं. यात ३०हून अधिक भाविक जखमी झाले असून जखमींना वणी तर काहींना नांदुरी येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने CBIची विनंती फेटाळली

दरम्यान, स्थानिक नागरिक पोलिसांच्या काही ग्रामस्थांच्या साह्याने अपघात स्थळावर बचाव कार्य करण्यात आले आहे. दाभाडी येथील हे भाविक नवीन गाडी घेतल्याने देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. परंतु या नवीन वाहनातून जात असतानाच त्यांचा रस्त्यात अपघात झाला आहे. गडाकडे जाणाऱ्या मार्गावर चढ संपून उतरती लागल्यानंतर वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

इंच इंच जागा घेऊ! सीमा प्रश्नावर विधानसभेत एकमतानं ठराव मंजूर; कर्नाटक सरकारचा निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here