युगांडाचा शेतकरी मोसेस हसहाया त्यांच्या मोठ्या कुटुंबासाठी जगभरात ओळखला जातो. त्यांनी इतक्या वर्षात १२ बायकांपासून १०२ मुलं जन्माला घालली आणि त्यांना ५६८ नातवंडं आहेत. इतकं केल्यानंतर ही व्यक्ती कुटुंब नियोजनाचा विचार करत आहे. विशेष म्हणजे इतक्या मुलांना जन्म दिल्यानंतर आता मुसा पत्नींसाठी गर्भनिरोधक औषधांपासून ते वेगवेगळ्या पद्धतींचा विचार करत आहे.

हे कुटुंब नाही संपूर्ण गाव आहे
मुसा हसहाया युगांडाच्या लुसाका शहरात राहतो. जिथे एका पेक्षा अधिक लग्न करणं हा कायदेशीर गुन्हा नाही. याच कारणामुळे तो एकामागून एक लग्न करत राहिला आणि आता त्याला १२ बायका आहेत. त्याच्या सर्व बायका एकाच घरात राहतात, जेणेकरुन तो त्यांच्यावर लक्ष ठेवू शकेल.
त्यांना एकूण १०२ मुलं आहेत, त्यापैकी ११ मुलं सर्वात धाकटी पत्नी जुलेका हिची आहेत. सध्या वाढता खर्च पाहता कुटुंबांची वाढती संख्या थांबवण्याचा निर्णय मुसाने घेतला आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ६७ वर्षीय मुसा आता वाईट आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंब नियोजनाचा विचार करत आहेत आणि त्यांच्या पत्नी गर्भनिरोधकांचा वापर करत आहेत.

खराब आर्थिक स्थितीने कंबरडे मोडले
१०२ मुलांना जन्म दिल्यानंतर मुसाच्या लक्षात आले की जगण्याचा खर्च वर्षानुवर्षे वाढत आहे आणि शेती व्यवसायातून मिळणारे उत्पन्न कमी आहे. मुसाच्या मुलांपैकी एक तृतीयांश मुले ६ ते ५१ वयोगटातील आहेत. सर्व मुले त्याच्यासोबत शेतीची कामे करतात. मुसाचा मोठा मुलगा मुसाच्या ११ व्या पत्नीपेक्षा २१ वर्षांनी मोठा आहे. गरिबीमुळे मुसाच्या २ बायका त्याला सोडून गेल्या आणि आता उरलेल्या बायका गर्भनिरोधक गोळ्या वापरत आहेत.